मुंबई - कोरोना व्हायरसच्या अतिक्रमणानंतर जेव्हा अनलॉक व्हायला लागला तेव्हा टेलिव्हिजन मालिकांनी जोखीम पत्करत लोकप्रिय मालिकांच्या नवीन भागांच्या चित्रीकरणास सुरुवात केली. नंतर खोबळलेल्या व नवीन मालिकांच्या निर्मितीही प्रारंभ झाला. स्टार प्रवाहांनी लॉकडाऊन काळातच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेची निर्मिती करत प्रसारण सुरु केले. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. माईंनी गौरीचा सून म्हणून स्वीकार करुन तिला शिर्के-पाटलांच्या सुनेचे सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे शिर्के-पाटील कुटुंबावरचं तिरस्काराचं सावट दूर झालंय. एकीकडे माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारलं आहे तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीचं नातंही बहरू लागलं आहे. लवकरच जयदीप गौरीला कार चालवायला देखील शिकवणार आहे.
मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभू म्हणाली, ‘जयदीप-गौरी या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरीचं नातंही दिवसेंदिवस बरहतंय. लवकरच मालिकेत एक छान ट्रॅक पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जयदीप गौरीला कार चालवायला शिकवतो. खरं सांगायचं तर मला ड्रायव्हिंग अजिबाज जमत नाही. हा सीन करताना मला जयदीप म्हणजेज मंदार जाधवने कार शिकवली. सुरुवातीला खूपच भीती वाटत होती. मात्र मंदारचं मार्गदर्शन आणि संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे मी हा सीन करु शकले.’
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.
हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ नंतर हसणं ‘अनलॉक’ करण्यासाठी येत आहे ‘कॉमेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस्’!