ETV Bharat / sitara

प्रेग्नेन्सीमध्ये गिगी हदीद पडली भारतीय मसाल्यांच्या चवीच्या प्रेमात - प्रेग्नेन्सीमध्ये गिगी हदीदने चाखले भारतीय मसाले

सुपरमॉडेल गिगी हदीद आणि गायक झेन मलिक यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गिगीने तिच्या चाहत्यांना ती प्रेग्नेंट असतानाचे तिच्या किचनमधील भारतीय मसाल्यांसह एक फोटो शेअर केला आहे.

Gigi Hadid
सुपरमॉडेल गिगी हदीद
author img

By

Published : Dec 28, 2020, 7:38 PM IST

मुंबई - सुपर मॉडेल गिगी हदीदने आपल्या पहिल्या मुलासाठी गर्भवती असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. गरोदरपणात ती काय चव घेत होती याची एक झलक दाखवताना, गीगीने भारतीय मसाल्यांनी भरलेल्या तिच्या किचनमधील कॅबिनेटचा एक फोटो शेअर केला आहे.

अलीकडील सोशल मीडिया ट्रेंडचा एक भाग म्हणून हदीदने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला.

Gigi Hadid developed a love for Indian spices
गिगी हदीदच्या किचनमधील भारतीय मसाले

१६ सप्टेंबरपासून फोटो शेअर करण्याची विनंती चाहते करीत होते. त्या पार्श्वभूमीवर तिने हा एक फोटो पोस्ट केलाय. यात गिगीने एक छान व्यवस्था केलेला स्वयंपाकघरातील कॅबिनेटचा फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये मसाल्यांचे बॉक्स रचले आहेत. या फोटोला तिने गंमतीशीर कॅप्शन दिलंय, ''मी एक मनोरुग्ण प्रेग्नेंट व्यक्ती होते'', असे तिने हासत म्हटले आहे.

२४ सप्टेंबर रोजी सोशल मिडीयाद्वारे गिगी आणि झेनने आपल्या मुलीचे स्वागत केल्याची बातमी शेअर केली होती.

हेही वाचा -कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत पोहोचली कंगना रणौत

झेन आणि गिगी यांनी प्रथम नोव्हेंबर २०१५ मध्ये डेटिंगला सुरुवात केली. मार्च २०१८ मध्ये त्यांचे विभाजन झाले, परंतु लवकरच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या रोमान्सला पुन्हा सुरुवात केली. जानेवारी २०१९मध्ये त्यांचे पुन्हा ब्रेकअप झाले होते. अखेर ते पुन्हा एकत्र आले असून त्यांच्या संसारात आता चिमुकलीचे आगमन झाले आहे.

हेही वाचा -सेटवर 'अदृष्य' वावरतात पंकत्र त्रिपाठी - किर्ती कुल्हारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.