ETV Bharat / sitara

आता बदललेत वारे... त्यामुळे रामदास पाध्येसोबत पाहुयात 'घरात बसले सारे' - अर्धवट राव आवडा अक्का

रामदास पाध्ये यांचे बोलके बाहुले ‘अर्धवट राव, आवडा अक्का’ आणि त्यांच्या गमती-जमती आपण पाहिल्या असतील. आता हेच अर्धवट राव आणि आवडा अक्का यांच्यासमवेत त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग यांच्यासोबत घेऊन आला आहे. हा नवा कोरा कार्यक्रम आहे, ‘घरात बसले सारे’. हा शो ८ जूनपासून संध्या. ७ वाजता झी मराठीवर सुरू झाला आहे.

gharat-basale-sare
घरात बसले सारे
author img

By

Published : Jun 12, 2020, 4:49 PM IST

मुंबई - लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचे पुनःप्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचे प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. पण आता झी मराठी वहिनीने मर्यादित भागांच्या नवीन मालिका आणि रिएलिटी शोज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचे काही क्षण देण्यासाठी हे कार्यक्रम सज्ज झाले आहेत.

रामदास पाध्ये म्हटले की, आपल्याला आठवतात ते बोलके बाहुले अर्धवट राव व आवडा अक्का आणि त्यांच्या गमती जमती. रामदास पाध्ये यांचे बोलके बाहुले ‘अर्धवट राव, आवडा अक्का’ आणि त्यांच्या गमती-जमती आपण पाहिल्या असतील. आता हेच अर्धवट राव आणि आवडा अक्का यांच्यासमवेत त्यांचा मुलगा चंदन, सून सुनयना आणि नातू छोटू सिंग यांच्यासोबत घेऊन आला आहे. हा नवा कोरा कार्यक्रम आहे, ‘घरात बसले सारे’. या कार्यक्रमाबद्दल रामदास पाध्ये म्हणाले, "मी देश विदेशात या बाहुल्यांचे अनेक प्रयोग केले, पण डेली सोपमध्ये असा प्रयोग कधीच केला नव्हता. पण आता मी माझ्या बोलक्या मित्रांसोबत (मी त्यांना बाहुले म्हणणार नाही कारण ते माझे मित्रच आहेत) एक वेगळा प्रयोग करणार आहे. या लॉकडाऊनमध्ये हा कार्यक्रम साकारताना माझ्या फॅमिलीची म्हणजेच अपर्णा पाध्ये, सत्यजित आणि ऋजुता पाध्ये यांची सुद्धा खूप मदत झाली.

सत्यजितने या बाहुल्यांना आवाज तर दिलाच, पण त्याचसोबत या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली. तसेच ऋजुता पाध्ये यांनी या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाची जबाबदारी घेतली आहे. या मालिकेत चंदन आणि सुनयना यांच्यातील तू तू मै मै आणि त्यांच्या जीवनात घडण्याऱ्या मजेशीर गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या मालिकेचे खास आकर्षण म्हणजे छोटू सिंगचं रॅप सॉंग आणि त्याच्या गमती-जमती असणार आहेत."'घरात बसले सारे' हा बोलक्या बाहुल्यांचा धमाल कार्यक्रम ८ जून पासून संध्या. ७ वाजता झी मराठीवर सुरू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.