ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीमध्ये गायत्री दातार कोणाला देणार मिरचीची धुरी? - बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना निरनिराळे टास्क्स दिले जातात. यावेळी नवा टास्क असेल ‘हल्ला बोल’. गायत्रीचं म्हणणं पडलं की ती टास्क जिंकण्यासाठी समोरच्या टीममधील प्रतिस्पर्ध्याला मिरचीची धुरी देणारच.

author img

By

Published : Sep 28, 2021, 8:20 PM IST

बिग बॉस हा कार्यक्रम जगभरात पसंत केला जातो. आपल्या देशातील हिंदीमध्येसुद्धा तो खूप पॉप्युलर आहे. प्रादेशिक भाषांमधील बिग बॉस नुकताच मराठीमध्ये सुरु झाला असून त्याला प्रेक्षक-पाठिंबा मिळतोय. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना निरनिराळे टास्क्स दिले जातात. यावेळी नवा टास्क असेल ‘हल्ला बोल’. या टास्कमध्ये समोरच्या टीमला मोटर बाईकवरुन उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे.

याच टास्क संदर्भात दोन्ही टीम्स चर्चा करताना दिसणार आहेत. उत्कर्ष-अक्षय, गायत्री-जय, स्नेहा-मीरा, तृप्ती देसाई-संतोष म्हणजेच दादुस यांच्या ग्रुपमध्ये टास्क सुरू होण्याआधी चांगलीच चर्चा रंगली. कसं आणि काय काय वापरून सदस्यांना उठवता येईल यावर खलबतं झाली. हल्ला बोल टास्कमध्ये वाद तर होणारच त्यामुळे सदस्य जिंकण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करतील हे बघणे इंटरेस्टिंग असेल.

ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने त्याला पटतील अश्या युक्त्या काढल्या. गायत्रीचं म्हणणं पडलं की ती टास्क जिंकण्यासाठी समोरच्या टीममधील प्रतिस्पर्ध्याला मिरचीची धुरी देणारच. कोणी सांगितलं कचरा टाकेल, कोणी टाकेल अंडी तर कोणी टाकेल साबणचं पाणी टाकुया. यांच्या या युक्त्या त्यांची किती साथ देतात हे बघणे प्रेक्षकांसाठी मनोरंजनीय असेल.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा प्रसारित होतो कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.