रायपूर - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील उर्मापाल गावाचा रहिवासी असलेला विद्यार्थी सहदेव सध्या इंटरनेटवर लोकप्रिय झाला आहे. त्याने गायलेले 'बचपन का प्यार' या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. हे गाणे सहदेवने सुकमा जिल्ह्यात स्थित पेंडलनार येथील वसतिगृहात इयत्ता तिसरीत शिकत असताना गायले होते. 2019 मध्ये शाळेतील शिक्षकाने त्याने गायलेले हे गाणे आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केले. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सहदेवचे व्हायरल गाणे
सहदेव सध्या पाचवीत शिकत आहे. 2 वर्षापूर्वी त्याने हे गाणे गायले होते. सुकमा जिल्ह्यातील सहदेवचे 'बचपन का प्यार' हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला बॉलिवूड गायक बादशाहने बोलावले. बादशाहने पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर सहदेवशी चर्चा केली व त्याचे गाणे ऐकले. यानंतर बादशहाने सहदेवला चंदीगडला बोलावले आणि त्याच्याशी चर्चा केली.
सहदेवसोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल
गायक बादशहासोबत गाणे रेकॉर्ड केल्यानंतर सहदेवने थेट सीएम हाउस गाठले आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. सहदेवने आपले हिट गाणे मुख्यमंत्र्यांना तसेच मंत्री कावसी लखमा यांनाही ऐकवले.
कोण आहे 'बचपन का प्यार' गाण्याचा मूळ गायक
हे गाणे गुजरातमधील आदिवासी लोकगायक कमलेश बारोट यांनी गायले आहे. हे गाणे 2018 मध्ये बनवण्यात आले होते. हे ओरिजिनल गाणे देखील व्हायरल आहे. तिसराच्या वर्गात शिकणाऱ्या छत्तीसगडमधील सुकमाचा विद्यार्थी सहदेवने 'बचपन का प्यार' हे गाणे गायले आणि या गाण्याचे देशभर लोक वेडे झाले. भरपूर मीम्स आणि व्हिडिओज या गाण्यावर बनले होते.
तर 'बचपन का प्यार' या गाण्याचे मूळ गायक कमलेश बोराट यांनी 6000 गाणी गायली आहेत. तो एक गीतकार देखील आहे आणि स्वतः गाणी तयार करतो. खुद्द कमलेशनेही सहदेवचे कौतुक केले आहे.
'बचपन का प्यार' गाणे भोजपूरीतही लोकप्रिय
हे गाणे भोजपुरी गायक मोनू अलबेला यांनी गायले असल्याचीही चर्चा आहे. मोनू अलबेला याने नुकतेच गाण्याचे रीशूट करून एक व्हिडिओ तयार केला आहे. मोनू अलबेला यांचे 'बचपन का प्यार' हे गाणे पुन्हा एकदा यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. अजय बच्चन यांनी हे गाणे लिहिले आहे. मोनू अलबेला सोबत महिला गायिका अंतरा सिंह प्रियांका हिनेही या गाण्याला आपला सुंदर आवाज दिला आहे.
हेही वाचा - रॉनी स्क्रूवाला यांच्या 'आरएसवीपी'चे ‘पँथर्स’ द्वारे वेब पदार्पण!