मुंबई - चोप्रा सिस्टर्सचे तुम्ही फॅन असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. 'फ्रोझन' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. प्रियंकाने एक व्हिडिओ शेअर करीत 'फ्रोझन २' ची एक झलक दाखवली आहे.
या क्लिपमध्ये प्रियंका म्हणते, 'हमें रानी बनने के लिए राजा की आवश्यकता नहीं है और हमारे लिए तारे लाने की कोई आवश्यकता नहीं, वह हमारे पास खुद चलकर आएंगे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'फ्रोझन २' ही एल्सा आणि अन्ना या दोघींची कथा आहे. २०१३ मध्ये आलेल्या 'फ्रोझन' या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. यात प्रियंका आणि परिणीती हिंदी व्हर्जनसाठी काम करीत आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
कामाचा विचार करता प्रियंका चोप्राचा 'द स्काई इज पिंक' हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला होता. यात फरहान अख्तरने तिच्या पतीची भूमिका केली होती, तर झायरा वसीमने तिच्या मुलीची व्यक्तीरेखा साकारली होती.