ETV Bharat / sitara

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये साजरा होणार ‘फ्रेंडशिप डे’! - ‘फ्रेंडशिप डे’ सेलेब्रिशन

झी मराठीवरील संगीत रियालिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्येदेखील ‘फ्रेंडशिप डे’ साजरा होणार आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर देखील दोस्तीयारीचा जल्लोष होणार आहे.

'Saregampa Little Champs'!
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये ‘फ्रेंडशिप डे’!
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:15 PM IST

पाश्चिमात्य देशांत साजरा होणारा ‘फ्रेंडशिप डे’ आपल्याकडेही साजरा केला जातो. हे मैत्रीचं सेलिब्रेशन सर्वच स्तरावर, खासकरून तरुणाईकडून साजरे होताना दिसते. झी मराठीवरील संगीत रियालिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्येदेखील ‘फ्रेंडशिप डे’ साजरा होणार आहे.

सारेगमप म्हणजे सुरीली मैफिल आणि झी मराठीने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना या सुरील्या मैफिलीत गेली अनेक वर्ष दंग करून ठेवले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम प्रेक्षकांचा खास आवडता आहे. या कार्यक्रमातील छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून उत्तम गायकी अनुभवायला मिळतेय. 'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत.

प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. आता पर्यंत अनेक लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ द वीकचा किताब देखील मिळाला आहे. लवकरच सर्वजण फ्रेंडशिप साजरा करणार आहेत. या विशेष भागाची सुरुवात पंचरत्न आणि या स्पर्धकांच्या एका धमाकेदार सादरीकरणाने होणार आहे. या भागात लिटिल चॅम्प्स देखील दमदार परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत.

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर देखील दोस्तीयारीचा जल्लोष होणार आहे. या विशेष भागासाठी सारेगमपमधील काही स्पर्धक या मंचावर येणार आहे. जुईली जोगळेकर, शमिका भिडे, सागर फडके, अवंती पटेल आणि शाल्मली सुखटणकर हे पुन्हा एकदा सारेगमपच्या मंचावर आपल्या सुरांची जादू पसरवण्यासाठी सज्ज होणार आहेत. यांच्यासोबत पंचरत्न आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतील. धमाल, मजा, मस्तीने रंगलेल्या या भागात रव्याचा लाडू म्हणजेच स्वरा जोशी लिटिल चॅम्प्स मधील काही स्पर्धकांची नक्कल करणार आहे.

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ हा सांगीतिक रियालिटी शो झी मराठीवर प्रदर्शित होतो.

हेही वाचा - आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.