मुंबई - गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने कला जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिवाराच्या सांत्वनासाठी कला जगतातील विविध मान्यवर येत आहेत.
फिल्म अभिनेत्री काजोल, गायक अलका याग्निक यांनी त्यांच्या परिवारांची भेट घेतली. टीव्ही कलाकार के के गोस्वामी अर्थात गबरू यांनीसुद्धा त्यांच्या परिवारांची भेट घेतली. गबरू बप्पीदा यांचे प्रचंड आवडते असे कलाकार होते. या प्रसंगी गबरू यांनी काही भावना व्यक्त केल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
हेही वाचा - Bappi Lahiri Lesser Known Facts: मायकेल जॅक्सनलाही बप्पीदांच्या 'जिमी जिमी' गाण्याची पडली होती भुरळ