ETV Bharat / sitara

'तुफान' चित्रपटासाठी फरहान अख्तर 'अशी' करतोय तयारी, व्हिडिओ व्हायरल - व्यायाम

२०१३ साली आलेल्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात त्याने मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. आता पुन्हा एकदा ओमप्रकाश मेहरा आणि फरहान 'तुफान' चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

'तुफान' चित्रपटासाठी फरहान अख्तर 'अशी' करतोय तयारी, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Jul 27, 2019, 6:21 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर 'भाग मिल्खा भाग' चित्रपटानंतर ओमप्रकाश मेहरांच्या 'तुफान' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी तो जिममध्ये अथक मेहनत घेताना दिसतो. आत्तापर्यंत त्याने या चित्रपटाबाबत बरेचसे अपडेट्स चाहत्यांशी शेअर केले आहेत. तसेच, तो या चित्रपटाची कशी तयारी करतो, याचे व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या त्याच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा पाहायला मिळतेय.

फरहान अख्तरने आत्तापर्यंत बरेचसे चित्रपट साकारले आहेत. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांच्या २०१३ साली आलेल्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात त्याने मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. आता पुन्हा एकदा ओमप्रकाश मेहरा आणि फरहान 'तुफान' चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

सोशल मीडियावर फरहानने शेअर केलेल्या व्हिडिओत तो कठिण असा व्यायाम करताना दिसतो. हा व्यायाम पाहायला सोपा वाटतो, मात्र, तो करणे तेवढाच अवघड असल्याचे त्याने म्हटले आहे. तर, दोन तास जीममध्ये घाम गाळल्यानंतर अशाप्रकारे आपली सुटका होते, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिले आहे.

फरहान या चित्रपटासोबतच त्याच्या आणि शिबानी दांडेकर हिच्यासोबतच्या रिलेशनशीपमुळेही चर्चेत आहे. अलिकडेच दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंचीही बरीच चर्चा झाली. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्याची माहिती दिली होती.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.