ETV Bharat / sitara

ईटीव्ही भारत Exclusive : अभिनेते गिरीश ओक यांची विशेष मुलाखत.. - गिरीश ओक मुलाखत

अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता राज्य शासनाच्या काही अटी अणि नियंमाचे पालन करत मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे. नुकतेच झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले आहे. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली आहे. पाहुयात ही विशेष मुलाखत...

ETV Bharat Exclusive interview with Girish Oak
ईटीव्ही भारत Exclusive : अभिनेते गिरीश ओक यांची विशेष मुलाखत..
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:24 PM IST

हैदराबाद : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर जवळपास तीन महिने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद होते. यादरम्यान, मालिकांचे प्रक्षेपणही बंद होते. मात्र, अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता राज्य शासनाच्या काही अटी अणि नियंमाचे पालन करत मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे. नुकतेच झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले आहे. ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली आहे. पाहुयात ही विशेष मुलाखत...

१. शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात..

अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, राज्य सरकारच्या मार्गदर्शिकेनुसार मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांनुसार काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मनुष्यबळावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. सेटवर काम करताना शारिरीक अंतर पाळून, मास्क लावणे, चित्रीकरण सेटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशाप्रकारे योग्य ती काळजी घेतली जात आहे. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत काम सुरू असल्याची माहीती त्यांनी दिली.

ईटीव्ही भारत Exclusive : अभिनेते गिरीश ओक यांची विशेष मुलाखत..

२. प्रेक्षकांसोबत पुन्हा जुळण्याची संधी..

18 मार्चला मालिकांचे चित्रीकरण बंद झाल्यानंतर सगळे घरी होते. मात्र या काळात वेगवेगळ्या माध्यमांतुन प्रेक्षकांच्या संपर्कात होतो. आता तीन महिन्यानंतर चित्रीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे, मालिकेच्या रुपातून पुन्हा प्रेक्षकांसोबत जुळण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सागितले.

३. सध्या जास्त काळजी घेत आहोत..

पूर्वी चित्रीकरण करताना, सेटवर वावरताना एकप्रकारचा सहजपणा होता मात्र, आता परिस्थिती बदलली असून सगळ्यांसोबत वावरताना खूप काळजी घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक जण वैयत्तिक पातळीवर काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

४. सेटवरील लोकांची भीती घालवण्याचा प्रयत्न..

कोरोना रुग्णांचे वाढते आकडे ऐकून कधी-कधी सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. मी डॉक्टर असल्यामुळे बऱ्याच वेळा मी माझ्याकडे असलेली, मला मिळालेली माहिती त्यांना सांगून ती भीती घालवण्याचा प्रयत्न करतो. श्वसनाचे व्यायाम, किंवा माहितीपर व्हिडिओ असेल तर तो त्यांना दाखवून सेटवरील वातावरण हलके करण्याचा प्रयत्न ते करतात असे ओक यांनी सांगितले.

५. नाटक, मालिका. चित्रपट एका अभिनेत्यासाठी त्याच्या मुलांसारखी..

नाटक, मालिका, चित्रपट यांपैकी सर्वात जास्त काय आवडते या प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश ओक म्हणाले की, नाटक-मालिका-चित्रपट तिन्ही माध्यमे एका अभिनेत्यासाठी त्याच्या मुलांसारखी असतात. तिन्ही ठिकाणी अभिनय करण्याचे वेगवेगळे निकष असतात. मात्र, मालिका आणि चित्रपट वगळता नाटकांमध्ये काम करताना जो जिवंतपणा जाणवतो तो बाकी माध्यमांमध्य़े नाही. नाटकांना जो प्रतिसाद प्रत्यक्षात प्रेक्षकांकडुन मिळतो, तो कलाकाराला थेट मिळतो असे ते म्हणाले.

६. ओटीटी प्लॅटफार्म ही एक जमेची बाजू..

सध्या शिक्षणासाठी, मनोरजंनासाठी ओटीटी (ओवर द टॅाप) प्लॅटफॉर्मचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या बहुपयोगी माध्यमातुन लोकांना अनेक विषयांवरील माहीती घेता येत आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातुन कुठलीही माहीती पण घेऊ शकतो. आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याचे चित्रपट, मालिका बघू शकतो. एकंदरीत आपण या माध्यमातून सगळ्यांशी जोडून राहू शकतो असेही ते म्हणाले.

७. मालिकांमध्ये शेफ पण खऱ्या आयुष्यात?

मालिकांमध्ये अभिजीत ही शेफची भुमिका साकारणारे अभिनेते गिरीष ओक प्रत्यक्षात मात्र पाककलेत निपुण नाहीत. मात्र, घरी असल्यावर किचनमध्ये स्वंयपाकात मदत करणे, कधी-कधी पदार्थ बनवणे त्यांना आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

८. नागपुरशी कायम नाळ जुळलेली..

चित्रपट असो किंवा नाटकासाठी नागपुरला जाण्याचा योग आला, की जन्मगावी आल्याची भावना आपसुकच निर्माण होते. तिथे वावरताना, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्या ठिकाणी आपण वाढलो ज्या ठिकाणी आपण घडलो त्याबद्ल आपलेपणा हा निर्माण होतो असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.