मुंबई - 'काहे दिया परदेस' या प्रसिद्ध मराठी मालिकेतील अभिनेत्री तसेच 'परफेक्ट पती' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली आणि पोलीस लाइन, आटपाडी नाईट्स, मन फकिरा, सातारचा सलमान, AB & CD, गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात प्रमुख भूमिका केलेल्या अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी पहिल्यांदा सायलीने पहाटेचा ब्रह्म मुहूर्त साधत पहाटे नाशिकच्या घरी बाप्पांची स्थापना केली. सायली दरवर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करत असते, मात्र या वर्षी तिने पर्यावरणपूरक देखावाही केला आहे. सायलीच्या घरी गणपतीसोबत मंगळा गौरीचंही आगमन होते. आज तिने सहपरिवार स्वतः श्री गणेशाची स्थापना करून मनोभावे पूजा केली. जगभरावर आलेलं कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना तिने बाप्पाकडे केली.