मुंबई - अभिनेत्री कंगना रानावत स्वतःच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाची कथा स्वतःच्या अनुभवावर आधारित असणार असल्याचे कंगनाने सांगितले. कंगना म्हणाली, "माझी कथा रंकाचा राजा बनण्याची गोष्ट आहे., ज्याच्यात अनेक चढाव उतार आहेत. हा एक महान सिनेमॅटिक अनुभव असेल."
कंगना म्हणाली, "माझ्यासाठीही अविश्वसनीय असलेला अनुभव तुमच्यासोबत वाटण्यासाठी मी उत्साही आहे. माझी गोष्टी जादूपेक्षाही जादूई आहे."
एका जवळच्या सूत्रानुसार चित्रपटाची स्क्रिप्ट 'बाहुबली' आणि 'मणिकर्णिका'सारखे चित्रपट लिहिणाऱ्या के.वी. विजयेंद्र प्रसाद यांची असेल. यावर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होईल.
मनाली जवळच्या एका छोट्या गावातून येऊन कंगनाने बॉलिवूडमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने 'गँगस्टर', 'वो लम्हे', 'लाइफ इन ए .. मेट्रो', 'तनु वेड्स मनु' आणि 'फॅशन' यासारख्या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवली आहे.
ज्यांच्याशी कंगनाचे मतभेद आहेत अशा लोकांच्या व्यक्तीरेखा चित्रपटात असतील का ? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला.
ती म्हणाली, "आम्ही कोणाचेही नाव घेणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या आयुष्यातील चढ उतार दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे."
कंगना सध्या 'मेंटल है क्या' आणि 'पंगा' या चित्रपटात काम करीत आहे.