ETV Bharat / sitara

ईडीने नोंदवला सुशांतची बहिण प्रियंकाचा जबाब - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण

दिल्लीतील एजन्सीच्या मुख्यालयात बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देशातील अव्वल आर्थिक चौकशी एजन्सी-एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने त्याची (सुशांतची) बहीण प्रियंका सिंग हिचा जवाब नोंदवला. यापूर्वी ईडीने या प्रकरणात बर्‍याच लोकांची विचारपूस केली असून जवाबही घेतले आहेत.

Sushant's sister Priyanka's reply
सुशांतची बहिण प्रियंकाचा जवाब
author img

By

Published : Aug 21, 2020, 5:32 PM IST

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात दिवंगत अभिनेत्रीची बहीण प्रियंका हिचा जवाब प्रवर्तन संचालनालयाने नोंदवला आहे. यापूर्वी ईडीने सुशांतचे वडील केके सिंह यांचा जवाब नोंदवला होता.

सुशांतच्या वडिलांकडून ईडीने मुलाच्या बँक खात्यातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी केली. ईडीने दिवंगत अभिनेत्याची फिक्स्ड डिपॉजिट (निश्चित ठेव) आणि इतर गोष्टींबद्दलही विचारले.

हेही वाचा - महेश भट्ट-रिया यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, भट्ट यांना ट्रोलर्सनी झोडपले

आतापर्यंत ईडीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित, सुशांतचा सीए संदीप श्रीधर, सुशांतचा माजी मॅनेजर आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदी, रियाचा सीए रितेश शाह, सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि इतर वैयक्तिक कर्मचार्‍यांची चौकशी केली आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली आहे.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यातील 8 जून रोजीचे व्हॉट्सअॅप चॅट लीक झाले असून सध्या त्यावर जोरात चर्चा सुरू आहे. चॅट लीक झाल्यानंतर महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.