ETV Bharat / sitara

तन बुढा होता है, मन बुढा नही होता, 'सांड की आँख' चित्रपटातील तापसी, भूमीचा पहिला लूक प्रदर्शित

या चित्रपटात त्या दोघीही शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. अलिकडेच या दोघींच्याही जीवनावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

तन बुढा होता है, मन बुढा नही होता, 'सांड की आँख' चित्रपटातील तापसी, भूमीचा पहिला लूक प्रदर्शित
author img

By

Published : Apr 16, 2019, 12:31 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर दोघीही लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 'सांड की आँख' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्या दोघीही शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. अलिकडेच या दोघींच्याही जीवनावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर आता तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

'तन बुढा होता है, मन बुढा नही होता', असे कॅप्शन देत तापसी आणि भूमीचा पहिला लूक असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दोघीही वृद्ध अवतारात दिसत आहेत. दोघींच्याही हातात बंदुक घेतलेली आहे. तर, चंद्रो आणि प्रकाशी यांच्या ड्रेसींग स्टाईलमध्येच दोघींचाही लूक प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटातून दोघीही महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

या चित्रपटात दिग्दर्शक प्रकाश झा आणि मुक्काबाज फेम विनीत सिंग यांची देखील भूमिका आहे. फेब्रुवारी महिन्यातच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'वुमनीया' असे ठेवण्यात आले होते. मात्र, पुढे ते बदलुन 'सांड की आँख', असे करण्यात आले.

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि निधी परमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, तुषार हिरानंदानी हे दिग्दर्शन करत आहेत. हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी 'दृश्यम', 'एक विलन', 'ए.बी.सी.डी.-२' आणि 'ग्रॅन्ड मस्ती' यांसारख्या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.