मराठी रंगभूमीवर सध्या एका नाटकाची फार चर्चा आहे, एकांकिका स्पर्धा असो की नाट्यगृहाबाहेरचा कट्टा प्रत्येक जण एकमेकांना विचारतोय. काय रे तोडी मिल फॅन्टसी नाटक पाहिलस का...? भारतीय कला केंद्र आणि पुण्यातील थिएटर फ्लेमिंगो या संस्थेची निर्मिती असलेल हे नाटक सध्या चर्चेत आहे. त्यामागचं कारण आहे त्याचा विषय आणि त्याच सादरीकरण त्यामुळेच मुंबईत अवघे 5 प्रयोग झाले असले तरीही या नाटकाची चर्चा आहे.
विनायक कोळवनकर दिग्दर्शित या नाटकाचा विषय तसा तुम्हाला नवीन वाटणार नाही, कारण आजवर अधांतर, कॉटन 52 पॉलिस्टर 85 यासारख्या गिरणी कामगारांची व्यथा वेदना मांडणारी अनेक नाटक येऊन गेलीत. मात्र तोडी मिल फॅन्टसी हे त्याच्या पुढचा विषय मांडतं..
मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा कधीच आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वीं गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी..
गोष्ट सुरू होते ती आलिशान पबच्या बाथरूममधून जिथे दारू पिऊन हाय झालेल्या घट्या पावशेला इशा भेटते. ती शुद्धीत येईपर्यंत तिला साभाळण्याशिवाय पर्याय नसतो आणि तिथूनच घट्याच्या आयुष्यात येते ती फॅन्टसी.. या फॅन्टसीच्या जोरावर घट्या ते सार काही करतो जे त्याला फक्त स्वप्नात वाटत असतं. एवढंच नाही तर इशाला आपली गोष्ट सांगता सांगता तो त्याच्या जगण्यातला संघर्ष, झोपडपट्टीतल आयुष्य, बिझनेस करायचं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि तरीही आलेले अपयश हे सगळं तिला सांगतो.
नाटकाचा विषय तुम्हाला हार्डच वाटत असला तरीही त्याची मांडणी अतिशय प्रवाही, विनोदी अंगाने आणि रॉक म्युझिकचा पुरेपूर वापर करून करण्यात आली आहे. गोष्ट पुढे नेण्यासाठी अनेक ठिकाणी गाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नाटक पाहताना आपण उगीच घट्या पावशेचे दर्दभरे नाले ऐकतोय अस अजिबात वाटत नाही.
अभिनेता शुभंकर एकबोटे याने घनट्या पावशेच्या भूमिकेत जान ओतली आहे. तर कपिल रेडेकरने सूत्रधार आणि घनत्याचा मित्र अमेय दोन्ही भूमिका मस्त साकारल्या आहेत. तर प्रमिती नरके हिची ईशाही मस्त वाटते.
थोडक्यात काय तर घनट्या पावशेची गोष्ट आजच्या तरुणाईला जास्त अपील होणारी आहे. नाटकाचे प्रयोग मुंबई पुणे दोन्हीकडे झाले असले तरीही दोन्हीकडे झालेले असले तरीही दोन्हीकडे मिळालेला प्रतिसाद वेगवेगळा आहे. आता लोकांना हा वेगळा प्रयत्न आवडला तरच हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येणं शक्य होईल.