डॉ. श्रीराम लागू यांच्यावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाला आदेश मिळाले असून त्याची तयारी झाली आहे. मंगळवारी रात्री दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टारांचे निधन झाले होते. ही बातमी समजताच अनेकजण लागू यांच्या दर्शनासाठी रुग्णालयाकडे धावले. मात्र त्यांचे पार्थिव रुग्णालयाच्या शवागरात ठेवल्यामुळे अनेकांना दर्शन न घेताच परतावे लागले.
आज डॉ. लागू यांच्या कर्वेनगर येथील घराच्या बाहेर अनेक दिग्गज कलाकार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते.
डॉ. श्रीराम लागू यांचा मुलगा आनंद अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांच्या येण्याची प्रतीक्षा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात डॉक्टर लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
डॉ. लागू हे निरश्वरवादी होते. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतलाय. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील.