ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीच्या घरावर ‘एलियन्स’चा दरोडा आणि ‘मिशन नॉमिनेशन’मध्ये राडा! - बिग बॉस मराठी मिशन नॉमिनेशन

बिग बॉस मराठीच्या घरामधून नीथा शेट्टी साळवी घराबाहेर पडली आणि बिग बॉस मराठी सिझन ३ ला मिळाले या पर्वाचे टॉप १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:37 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामधून नीथा शेट्टी साळवी घराबाहेर पडली आणि बिग बॉस मराठी सिझन ३ ला मिळाले या पर्वाचे टॉप १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही. आता बिग बॉसच्या घरावर एलियन्सचा कब्जा होणार आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्य बिग बॉस च्या आदेशानुसार लिव्हिंग एरियात एकत्र जमले.

बिग बॉस मराठी

असं असलं तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नाव घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशाल कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला. नंतर विकास आणि सोनालीने विशालला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले.

बिग बॉस मराठी

बिग बॉसद्वारे देण्यात येणार्‍या टास्कचा संचालक आहे जय आणि टास्क दरम्यान जय आणि सोनालीमध्ये जोरदार भांडण झाले. आता नक्की काय झालं आणि कशावरून हा वाद वाढला हे कोणालाच कळले नाही. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगतेय “मिशन नॉमिनेशन” हे कार्य आणि या कार्यादरम्यान विकास आणि जयमध्ये चांगलाच राडा झाला. या कार्यामध्ये प्रत्येक सदस्य नॉमिनेशन पासून स्वत: ला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसतोय.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - 'डिअर फ्युचर हसबंड' या गाण्यावर थिरकली मिथिला पालकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.