मुंबई - दादर शिवाजी पार्क जवळ मराठी कलाकारांची रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र, आता या आनंदाच्या क्षणी कलाकारांसमोर एक वेगळीच समस्या उभी राहिली आहे. या कार्यक्रमात डीजे लावण्यावरून पोलीस आणि मराठी कलाकारांमध्ये वाद सुरू झाला आहे.
सायलंस झोन नसतानाही पोलिसांचा मराठी सिने कलाकारांना विरोध होत आहे. त्यामुळे, पोलिसांच्या अनेक कार्यक्रमला मराठी सिने कलाकार लागतात. मात्र कलाकारांच्या कार्यक्रमाला पोलिसांचा विरोध का? असा सवाल संतप्त सुशांत शेलार यांनी केला आहे.
यासंबंधी पोलिसांना रितसर अर्जदेखील केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचसोबत मराठी सण साजरा करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आणि तुम्हीही सहभागी व्हा, अशी विनंतीही सुशांतने पोलिसांनी केली आहे.