ETV Bharat / sitara

दिग्दर्शक रवी जाधव यांनी लॉकडाऊनमध्ये केली ही नवी सुरुवात, 'या' कलाकारांना दिलं आव्हान - Director Ravi jadhav clean roof

दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Director Ravi jadhav clean roof in lockdown, share video
दिग्दर्शक रवी जाधव यांनी लॉकडाऊनमध्ये केली ही नवी सुरुवात, 'या' कलाकारांना दिलं आव्हान
author img

By

Published : Apr 13, 2020, 1:09 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक रवी जाधव सध्या लॉकडाऊनमुळे घरीच वेळ घालवत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग सुरू नसल्याने त्यांच्याप्रमाणे इतरही कलाकार कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहेत. अशात रवी जाधव यांनी घरकाम करण्यास सुरुवात केली आहे. छोटी मोठी कामे केल्यानंतर त्यांनी फरशी पुसण्याचे काम सुरु केले आहे. ही माझी नवी सुरुवात असल्याचे म्हणत त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच, महिलांना फरशी पुसताना कसा त्रास होत असेल, त्याचा अनुभव घेत आहे, असे त्यांनी आपल्या व्हिडिओतून म्हटले आहे.

रवी जाधव यांनी या पोस्टमध्ये लिहिलेय, की 'मी थांबलोय घरी, नव्या उत्साहाने लिहितोय, वाचतोय, आवडती गाणी ऐकतोय आणि सोबत लादी साफ करतोय!!! कठीण आहे पण मजा येतेय. तुम्हीसुद्धा घरीच थांबा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. घरबसल्या अशाच काही छान गोष्टी तुम्हीसुद्धा करत असाल तर त्या नक्की व्हिडिओच्या रुपात शेअर करा'.

या व्हिडिओतून त्यांनी अभिनेता अंकुश चौधरी आणि प्रसाद ओक यांना हे आव्हान दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.