मुंबई - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच 'खानदानी शफाखाना' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातंल नवं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेता पियांश जोरासोबत सोनाक्षीचा खास अंदाज पाहायला मिळतो.
'दिल जानिये', असे या रोमॅन्टिक गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सोनाक्षी आणि पियांशची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते. जुबीन नौटीयाल आणि तुलसी कुमार यांच्या आवाजाचा स्वरसाज या गाण्यावर चढलाय. त्यामुळे हे गाणे प्रेक्षकांवर भूरळ पाडणारे आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शब्बिर अहमद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, पायल देव यांनी हे गाणे कंपोज केले आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीची आगळी वेगळी भूमिका पाहायला मिळेल.
शिल्पी दासगुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर, भूषण कुमार, मृगदीप सिंग लांबा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
सोनाक्षीने तिच्या या ट्विटर अकाऊंटवरील नाव देखील बदलले आहे. या चित्रपटात ती 'बेबी बेदी' हे पात्र साकारत आहे. तिच्या ट्विटर अकाऊंटवरही तिने हेच नाव ठेवले आहे.
या चित्रपटानंतर ती सलमान खानसोबत 'दबंग ३' चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचेही सध्या शूटिंग सुरू आहे.