मुंबई - स्कॅम मालिकेमुळे प्रसिध्द झालेला अभिनेता प्रतीक गांधीचा 'भवाई' या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडे प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे शीर्षक रावणलीला असे ठरले होते. मात्र यात रावणाची बाजू घेतली असल्याचे कारण पुढे करीत विरोध सुरू झाला. अखेर याचे शीर्षक भवाई असे करुन निर्मात्यांनी वाद नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. भवाई या गुजराती शब्दाचा नाटक असा अर्थ आहे. हार्दिक गज्जर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
रामलीला नाटकाच्या विषयावर आहे सिनेमा
चित्रपटाचा ट्रेलर खूप सुंदर आहे. एका गावात रामलीला हे नाटक येतं. ज्या गावात साधे नाटक झाले नव्हते अशा ठिकाणी रामलीलाचा खेळ होणार याची चर्चा सुर्वदूर पसरते. या गावात राहणारा एक उत्साही तरुण राजाराम जोशी (प्रतीक गांधी) याला समजते की नाटकवाल्यांना रामाच्या भूमिकेसाठी नटाची गरज आहे. अशा तऱ्हेने त्याचा नाटकवाल्यांशी संबंध येतो. नाटकातील नायिकांना पाहून तो भारावून जातो. त्याला नाटकाच्या वस्तादाकडून अभिनयाचे धडे शिकवले जातात. तो सीतेची भूमिका करणाऱ्या सहअभिनेत्रीच्या प्रेमात पडतो. पण त्याच्या वाट्याला रावणाची भूमिका येते. इथून सुरू होते नाटकाच्या तालमीतील डायलॉगबाजी. यातील काही डायलॉग खटकल्यामुळे हा वाद रंगताना दिसतोय. या चित्रपटात रावणाचं उदात्तीकरण करण्यात आल्याची चर्चा आहे.
या सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा काहीजण आरोप करीत आहेत. तर काहींचे यामुळे प्रभू रामचंद्राचा अपमान होत असल्याचाही दावा आहे.
रावणलीला असे ठरले होते शीर्षक
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रतीक गांधीने यावर सोशल मीडियातून आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. रावणलीला हे शीर्षक बदलले असल्याचे त्याने यातून सांगितले होते. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले, "मी ज्या कथेचा भाग होतो ते चाहत्यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही. आम्ही एक टीम म्हणून निर्णय घेतला आहे की आमच्या चित्रपटाचं नाव 'भवाई' असणार आहे. यावरही अनेकांनी टीका केली आहे. केवळ नाव बदलून आणि ट्रेलरमधील काही दृश्यं हटवून यावरचा उपाय नाही".
निर्मात्यांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
-
We trust this clarifies all the misrepresentations, doubts and misgivings regarding our film #Bhavai!🙏
— PEN INDIA LTD. (@PenMovies) September 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
See you in THEATRES on Oct 1. Watch the film with your friends and family!@pratikg80 @AindritaR @AnkBhatia @gajjarhardik @chirucam #ParthGajjar @jayantilalgada @gada_dhaval pic.twitter.com/WEgmdco4Bz
">We trust this clarifies all the misrepresentations, doubts and misgivings regarding our film #Bhavai!🙏
— PEN INDIA LTD. (@PenMovies) September 20, 2021
See you in THEATRES on Oct 1. Watch the film with your friends and family!@pratikg80 @AindritaR @AnkBhatia @gajjarhardik @chirucam #ParthGajjar @jayantilalgada @gada_dhaval pic.twitter.com/WEgmdco4BzWe trust this clarifies all the misrepresentations, doubts and misgivings regarding our film #Bhavai!🙏
— PEN INDIA LTD. (@PenMovies) September 20, 2021
See you in THEATRES on Oct 1. Watch the film with your friends and family!@pratikg80 @AindritaR @AnkBhatia @gajjarhardik @chirucam #ParthGajjar @jayantilalgada @gada_dhaval pic.twitter.com/WEgmdco4Bz
या चित्रपटात काहीही वावगं नसल्याचा खुलासा निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिध्द करुन केला आहे. त्यांनी सांगितले की ही एक काल्पनिक कथा आहे. त्यांनी लिहिले, '' 'भवाई' ही राजा राम जोशी (प्रतीक गांधी) आणि राणी (इंद्रिता रे) या दोन व्यक्तिरेखांची काल्पनिक गोष्ट आहे. ते दोघंही एका नाटक कंपनीत काम करत असतात आणि स्टेजवर त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं याची ही गोष्ट आहे. मुख्य पात्र हे नाटकात रावणाची भूमिका करत असल्यानं चित्रपटाचं आधीचं नाव हे 'रावणलीला' होतं.'' असे निवेदन प्रसिध्द करुन शीर्षक बदलले असल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच ट्रेलरमधील आक्षेपार्ह वाटणारे डायलॉग्ज चित्रपटातून वगळ्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
हेही वाचा -बाप्पाला निरोप दिल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर शाहरुख खान