कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाच कधी नव्हे ती ‘ऑक्सिजन’ ची कमतरता जाणवू लागली. ऑक्सिजन वेळीच न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले. यामुळे लोकांत घबराट निर्माण झाली आणि सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत केंद्र आणि राज्य शासनांना सामान्य जनतेसाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याची सूचना केली. या कठीण काळात अनेक सेलिब्रिईज लोकांना वेगवेगळी मदत करतंच आहेत परंतु आता अनेकांनी ‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स‘ साठी सुद्धा मदत देऊ केलीय. यातील एक नाव म्हणजे निर्माती दीपशिखा देशमुख. दीपशिखा, निर्माते वसू भगनानी यांची मुलगी, अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीची बहीण, अभिनेता-निर्माता रितेश देशमुखची वहिनी आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची स्नुषा आहे.
![deepshikha-deshmukh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-deepshikha-deshmukh-donates-oxygen-concentrators-latur-covid-centres-mhc10001_25052021201027_2505f_1621953627_46.jpeg)
लातूर हे विलासराव देशमुख यांचे कार्यक्षेत्र होते आणि आता त्यांची मुलं तो प्रांत सांभाळतात. दीपशिखाने आपले यजमान धीरज विलासराव देशमुख यांचेही राजकीय कार्यक्षेत्र असलेल्या लातूर येथील लोकांसाठी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केलाय. तिने लातूरच्या कोविड सेंटर्ससाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स दान केले आहेत. नुकतेच तिने दैविक फाउंडेशनच्या मदतीने लातूरच्या रूग्णालयात ऑक्सिजन केंद्रे तयार केली आणि टेलिपोर्ट इंडियाच्या मदतीने रूग्णालयात पोहचवली. तसेच दीपशिखाने लातूरमधील तळागाळात जाऊन सामाजिक कार्य करीत असताना ‘असोशिएशन बियॉंड बाउंड्रीज’ या प्रगतीशील आणि प्रभावी गटासोबत कोविड बाधितांसाठी भरघोस मदत केली आहे. तिचा ‘लव्ह ऑरग्यानिकली’ हा आयुर्वेदिक ब्युटी ब्रँड आहे. नुकताच मातृदिन साजरा झाला आणि त्या आठवड्याच्या कमाईतून अग्निशामक उपकरणं, ऑक्सिजन केंद्रे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करून दान करण्यात आली. दीपशिखा आपल्या सोशल मीडियाचा वापर कोविड संबंधित माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी करीत असते.
स्व. विलासराव देशमुख यांची सून, दीपशिखा देशमुख, त्यांचे लोकसेवेचे कार्य आणि व्रत सुरु ठेऊन त्यांना एकप्रकारे मानवंदनाच देत आहे.
हेही वाचा - कांताबाई सातारकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक क्षेत्राचे मोठे नुकसान - बाळासाहेब थोरात