ETV Bharat / sitara

महेश कोठारेंच्या ‘ज्योतिबा’ने गाठली शंभरी! - दख्खनचा राजा ज्योतिबा 100 भाग

मालिकेचे शुटिंगही कोल्हापुरातच सुरू असल्यामुळे व मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचे ठरवले. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अपंग मुलांचे संगोपन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.

दख्खनचा राजा ज्योतिबा
दख्खनचा राजा ज्योतिबा
author img

By

Published : Feb 14, 2021, 7:36 AM IST

मुंबई - कोठारे व्हिजन्सच्या बॅनरखाली आदिनाथ आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेली ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही पौराणिक मालिका प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचे दर्शन घडवत आहे. स्टार प्रवाहवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. सामाजिक बांधिलकी जपत मालिकेच्या संपूर्ण टीमने कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्थेतील मुलांसोबत हा खास दिवस साजरा केला. मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ज्योतिबा आणि मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेत त्यांनी मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महेश कोठारेंच्या ‘ज्योतिबा’ने गाठली शंभरी!
महेश कोठारेंच्या ‘ज्योतिबा’ने गाठली शंभरी!

मालिकेचे शुटिंगही कोल्हापुरातच सुरू असल्यामुळे व मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचे ठरवले. चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिक अपंग मुलांचे संगोपन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे. या खास प्रसंगी निर्माते महेश कोठारे आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताची कथा उलगडत जाणारी मालिका ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच रोमहर्षक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस संपूर्ण टीमचा आहे.

पौराणिक मालिका ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ २२ फेब्रुवारीपासून नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी ६ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - चेन्नईचा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.