ETV Bharat / sitara

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार राज्याभिषेक सोहळा! - मुंबई लेटेस्ट न्यूज

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार राज्याभिषेक सोहळा होणार आहे. गुढीपाडवा विशेष भागातून ज्योतिबाचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.

दख्खनचा राजा ज्योतिबा
दख्खनचा राजा ज्योतिबा
author img

By

Published : Apr 12, 2021, 9:09 PM IST

मुंबई - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो. या दिवशी नव्या संकल्पांचा आणि नव्या उपक्रमांचा प्रारंभ होतो.

स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतही नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ज्योतिबाचा राज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. आजवर ज्योतिबाच्या कथा कहाण्या आपण ग्रंथांमधून वाचल्या आहेत.मात्र, दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या रुपात ज्योतिबाचं महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळत आहे. गुढीपाडवा विशेष भागातून ज्योतिबाचा भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. निर्माते महेश कोठारे यांनी जातीने लक्ष घालून हा सोहळा अद्वितीय करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

मालिकेतल्या या भव्यदिव्य राज्यभिषेक सोहळ्याविषयी सांगताना ज्योतिबाची भूमिका साकारणारा विशाल निकम म्हणाला, ‘ज्योतिबाची भूमिका साकारणं हेच मुळात माझ्यासाठी स्वप्नवत आहे. आता मालिकेत ज्योतिबाची राजा व्हायची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाराष्ट्राच्या या लाडक्या दैवताचा राज्याभिषेक होणार आहे. या विशेष भागासाठी आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. भव्यदिव्य सेटसोबतच, नयनरम्य रोषणाई, भरजरी वस्त्र, दुधाचा अभिषेक असा राजेशाही थाट असणार आहे. या भूमिकेच्या निमित्ताने हा सारा थाट मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो आहे. कोरोना काळातल्या सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आम्ही हे सीन शूट करत आहोत. आव्हाने खूप आहेत पण ज्योतिबाच्या आशीर्वादाने सगळं निर्विघ्नपणे पार पडत आहे.” ज्योतिबाचा राज्याभिषेक सोहळा गुढीपाडव्याला म्हणजेच १३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.