ETV Bharat / sitara

धक्क्यापेक्षा पुनरागमन अधिक मजबूत : अँजिओप्लास्टीनंतर रेमोने सुरू केला व्यायाम

author img

By

Published : Jan 9, 2021, 3:34 PM IST

Updated : Jan 9, 2021, 3:42 PM IST

कोरिओग्राफर रेमो डिसोझा याने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये व्यायम करताना दिसत आहे. अँजिओप्लास्टीनंतर पूर्णपणे आपले शारीरिक सामर्थ्य पुन्हा मिळवण्याचा निश्चय केलेल्या रेमोने सांगितले की धक्क्यापेक्षा त्याचे पुनरागमन अधिक मजबूत होईल.

Remo D'Souza
रेमो डिसोझा

मुंबई - कोरिओग्राफर-चित्रपट निर्माता रेमो डिसूझा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ह्रदयाचा त्रास झाला म्हणून रुग्णालयात दाखल झाला होता. तो आता आपले सामान्य जगणे पुन्हा सुरू करताना दिसला. रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर बरे झाल्यावर स्वतःचा एक व्हिडिओ रेमोने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ह्रदयाच्या ठोक्यांची नोंद ठेवत रेमो हलके वजन उचलताना या व्हिडिओत दिसत आहे. त्याने तोंडावर मास्क घातले आहे.

आरोग्याच्या संकटानंतर शिकलेल्या धड्यांचा विचार करून रेमोने पूर्वी सांगितले होते की, द्वेषाऐवजी प्रेमाने परिपूर्ण आयुष्य जगण्याचे महत्त्व आपल्याला कळले आहे. २०११ मध्ये F.A.L.T.U या चित्रपटाबरोबर चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी रेमो नृत्यदिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवला होती. त्याने एबीसीडी : एनिबडी कॅन डान्स (२०१३), एबीसीडी २ (२०१५) आणि रेस ((२०१८) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. वरुण धवन, नोरा फतेही आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर 3 डी हा चित्रपट २०२० मध्ये अखेरचा दिग्दर्शित केलेला सिनेमा होता.

हेही वाचा - "करियर किंवा पत्नी यापैकी कशाची निवड करशील" या प्रश्नाला आमिर खानने दिले होते 'हे' उत्तर

Last Updated : Jan 9, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.