मुंबई - गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे मनोरंजनविश्वदेखील आभासी जगात वावरतंय. इव्हेंट्स, मुलाखती, चित्रपट व कार्यक्रमासंदर्भातील घोषणा, संगीत लाँच यासर्वांबरोबरच डान्स आणि म्युझिक रियालिटी शोजच्या ऑडिशन्सदेखील व्हर्च्युअल झाल्या. मराठी रियालिटी शोजचं सांगायचं झालं तर त्यांनीही प्रतियमान पद्धतीनेच स्पर्धेच्या चाचण्या घेतल्या. आता अजून एक प्रसिद्ध मराठी संगीत कार्यक्रम नवीन पर्व घेऊन येऊ घातलाय. त्यांनीही आभासी चाचणीनेच स्पर्धकांना निवडायचे ठरविले आहे. कलर्स मराठीचा प्रसिद्ध व लोकप्रिय म्युझिक रियालिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरु होणार आहे ज्याची टॅग-लाईन आहे ‘आशा उद्याची’. या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे.
स्त्रियांना समान वागणूक देण्याबाबत चर्चा होतच असते परंतु यावेळी कलर्स मराठी वाहिनी एक अख्खा कार्यक्रमचं घेऊन येतेय, फक्त मुलींसाठी. महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे, त्यांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे, ‘सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची’ हे नवं कोरं पर्व घेऊन.
या अनोख्या पर्वात गायक मुलींना मार्गदर्शन करतील कार्यक्रमाचे दोन परीक्षक अर्थात सुप्रसिध्द गायक, संगीतकार अन अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून शोध घेतील, महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा, महाराष्ट्राच्या नव्या गायिकेचा.
या नव्या पर्वाच्या ऑडिशन्सची पहिली फेरी १८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत (कलर्सचे ॲप) ‘वूट’ च्या माध्यमातून सुरू होणार आहे. या पर्वात ॲाडिशन्स देऊ इच्छिणाऱ्या १५ ते ३० वयोगटातील मुलींनी आपल्या आवाजातील मराठी (अत्यावश्यक) व हिंदी गाण्यांचा व्हिडियो ‘वूट’ वर पाठवायचा आहे. ‘वूट’ वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. यातून निवडल्या जाणाऱ्या निवडक गायिकांबरोबर रंगणार सूरांचं हे अद्वितीय पर्व आणि यातूनच मिळणार महाराष्ट्राची ‘आशा उद्याची’.
या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी. ‘सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची’ ही नवी कोरी सूरांची सुमधुर मैफिल लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर रंगणार आहे.
हेही वाचा - विजय देवराकोंडाने स्तुती करताच 'लाजली' अनन्या पांडे!!
‘आशा उद्याची’ शोधण्यासाठी कलर्स मराठीचा यावेळचा ‘सूर नवा ध्यास नवा’, फक्त महिलांसाठी! - ‘Sur Nawa Dhyas Nawa’ new season
लोकप्रिय म्युझिक रियालिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरु होणार आहे ज्याची टॅग-लाईन आहे ‘आशा उद्याची’. या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे.