मुंबई - राष्ट्रीय बाल हक्क संघटना एनसीपीसीआरने नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज "बॉम्बे बेगम"मध्ये मुलांचे अनुचित चित्रण झाल्याचा ठपका ठेवत या मालिकेचे स्ट्रिमिंग थांबवण्यास सांगितले आहे.
गुरुवारी नेटफ्लिक्सला दिलेल्या नोटीसमध्ये, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) ओटीटी प्लॅटफॉर्मला २४ तासांच्या आत सविस्तर कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या मालिकेत मुलांच्या कथित अनुचित चित्रणाला आक्षेप घेताना आयोगाने असे म्हटले आहे की, अशा प्रकारचा आशय "तरुणांच्या मनाला प्रदूषित करू शकते" आणि यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते.
ही मालिका अल्पवयीन मुलांना सामान्य लैंगिक आणि मादक पदार्थांच्या गैरवर्तनात व्यग्र ठेवते या तक्रारीच्या आधारे आयोगाने ही कारवाई केली.
"मुलांच्या बाबतीत किंवा मुलांसाठी कोणताही आशय प्रसारित करताना नेटफ्लिक्सने अतिरिक्त खबरदारी घ्यावी आणि अशा गोष्टींमध्ये जाण्यापासून टाळावे," असे आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
“म्हणूनच, तुम्हाला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आणि त्वरित या मालिकेचे प्रसारण थांबवण्याचे व २४ तासात सविस्तर कार्यवाही अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत, असे न केल्यास सीपीसीआरच्या कलम १४ च्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यास कमिशनला बाध्य केले जाईल ( कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स, कायदा २००५) "आयोगाने म्हटले आहे.
"बॉम्बे बेगम" मालिका समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील पाच स्त्रियांच्या जीवनात डोकावते, यातील प्रत्येकाला जीवनात वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात.
हेही वाचा - ‘माझ्यासाठी भारतीय राष्ट्रगीत सर्वात बेस्ट कंपोझिशन आहे’, परिणीती चोप्रा!