ETV Bharat / sitara

Chabuk Movie Release : मधुर भांडारकरचा भाऊ कल्पेशचे चाबूकद्वारे पदार्पण - स्मिता शेवाळे

थोरले बंधू श्री.मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी स्वत:ची पहिली ‘चाबूक’ नावाची मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत. ‘चाबुक’ चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे, सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

Chabuk Movie
Chabuk Movie
author img

By

Published : Feb 22, 2022, 10:08 PM IST

मुंबई - कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. आपले थोरले बंधू मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी स्वत:ची पहिली ‘चाबूक’ नावाची मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत. ‘चाबूक’ चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे, सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

Chabuk movie
चाबुक
अनुभव आणि निरीक्षणाच्या मदतीने आत्मपरीक्षणाचा ‘चाबूक’ ओढण्याची गरज असल्याचे दाखवून देणारा ‘चाबूक’ चित्रपट एका कुटुंबाची कथा आपल्यासमोर मांडतो. ‘काहीतरी’ मिळवण्याच्या ध्यासापायी आपल्या हातातून बऱ्याच गोष्टी निसटत चालल्या आहेत याची जाणीव चित्रपटाच्या नायकाला नसते. ती जाणीव दोन फॅण्टसी फॅक्टर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून फार भन्नाट पद्धतीने या चित्रपटात करुन देण्यात आली आहे.

बेला शेंडेने दिला आवाज
जीवन म्हणजे नात्या-गोत्यांची घट्ट वीण. वेगवेगळ्या नात्यांच्या प्रेमळ बंधांनी आपण ती विणत असतो. मध्येच विसंवादाची गाठ बसली, तर नात्यांचे बंध ताणले जातात आणि धागा तुटतो. कधी कधी भान राखून वेळीच नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना. हीच कथा प़डद्यावर सांगणारा ‘चाबूक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘चाबुक’ चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे.
हेही वाचा - Third front : राऊत म्हणतात आमच्या शिवाय शक्य नाही, काॅंग्रेसने अहंकार बाजुला ठेवावा जाणकारांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.