लंडन - ब्रिटिश रॅपर टाय (खरे नाव बेन चिजिओके) यांचे कोरोना व्हायरसमुळे तयार झालेल्या गुंतागुंतीमुळे वयाच्या ४७व्या वर्षी निधन झाले आहे.
“चिजिओके या नावाने ओळखले जाणारे बेन चिजिओके यांचे निधन झाल्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटले आहे. जवळचे मित्र, कुटुंब आणि चाहते त्याच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झाले आहेत,” असे निधनाची बातमी देताना निवेदनात म्हटले आहे.
"टीवायची प्रकृती सुधारत होती. पण गेल्या आठवड्यात सामान्य वॉर्डमध्ये असताना त्याला न्यूमोनियाचा आजार झाला, ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि शेवटी टीवायचे शरीर परत लढा देऊ शकले नाही. सर्वांनाच हा धक्का बसला आहे."
''एप्रिलच्या सुरुवातीला या हिप-हॉप कलाकाराला कोरोनाची बाधा झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,'' असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
१९ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात त्याची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. त्यावेळी अतिदक्षता विभागातून त्याला बाहेर काढण्यात आले होते.१९७२ मध्ये जन्मलेल्या टायने 2001 मध्ये 'द ऑकवर्ड' या पहिल्या अल्बममधून प्रेक्षकांची मने जिंकली होती.