ETV Bharat / sitara

लॉक डाऊन : पोलिसांच्या वागणुकीवर बॉलिवूड नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला राग

बॉलिवूड सेलेब्सनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. पोलीस ज्याप्रकारे वागणूक देत आहेत, त्यावर टीका करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 27, 2020, 7:21 PM IST

BOLLYWOOD-CELEBS-
लॉकडाऊन

मुंबई - देशभर सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस ज्याप्रकारे जनतेशी वागत आहेत, ते बॉलिवूड सेलेब्सना खटकले आहे. देशात अनेक ठिकाणी पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे लोकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. यानंतर अनेक मोलमजुरीसाठी आलेले लोक आपल्या गावी परतत आहेत. वाहने नसल्यामुळे मुलाबाळांसह चालत जाणाऱ्या अशा अनेक लोकांना पोलिसांनी आपल्या लाठ्या काठ्यांनी सुजवले आहे. असाच एक व्हिडिओ शेअर करीत अनुराग कश्यप यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं., ''भयावह आहे.''

लेखक आणि कॉमेडियन वरुण ग्रोव्हरने हाच व्हिडिओ पोस्ट करीत विचारलंय, ''हा देश फक्त घरवाले आणि पॉवरवाल्यांचा आहे.'' त्याने लिहिलंय, ''एक मजूर आपल्या घरी ३०० किलोमिटर चालतही जाऊ शकत नाही? तो शहरातच भुकेने मरावा असे सरकारला वाटतेय का? तेही असा किटाणू ज्याच्याबद्दल त्याला माहितीही नाही.''

  • क्या भारत सिर्फ़ उनका है जिनके पास अपने घर और ताकत हैं?
    क्या मज़दूर शहर से 300km पैदल चलकर वापस अपने गाँव भी ना जाये ?
    क्या सरकार चाहती है ये शहरों में ही भूखे मर जाएं, एक ऐसे कीटाणु की खातिर जिसका उन्हें पता भी नहीं।
    (Video from Badaun, UP via @Zebaism)
    pic.twitter.com/3Y03KOWQmf

    — वरुण 🇮🇳 (@varungrover) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही राग व्यक्त करताना ट्विट केलंय, ''लाठी चार्जवाला काळ रोखा.''

थप्पड चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात दोन पोलीस आवश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या एका बाईकस्वाराला मारत आहेत. सिन्हा यांनी विचारलंय, ''अशा प्रकारे कोणाला तरी मारणे कायदेशीर आहे का?''

अभिनेत्री रिचा चढ्डाने लिहिलंय, ''जीवघेण्या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोकांना मरेपर्यंत मारणे याला काय अर्थ आहे?''

  • What's the logic behind beating people to death inorder to prevent them from dying of a virus ?

    — TheRichaChadha (@RichaChadha) March 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करीत सोनू सूद यांनी लिहिलंय, ''यांना घरी पोहोचण्यासाठी मदत करा. बहुतांश मजूर यूपी आणि बिहारचे आहेत. यांना राहण्यासाठी घर आणि आपल्या परिवारापर्यंत पोहोचण्याची सुविधा पाहिजे. रस्ता शोधण्याची आवश्यकता आहे, सर.@CMOofficeUP @arvindkejriwal.''

कोरोना व्हायरसच्या इलाजामध्ये होणाऱ्या भेदभावावर निर्माता शेखर कपूर यांनी प्रश्न उपस्थित केलाय आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.