मुंबई - सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बिग बॉसच्या सेटवर नवाजुद्दीन पोहोचणार असून सलमानसोबत धमाल मस्ती करताना दिसणार आहे.
ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'ची सलमान आणि नवाजची जोडी 'बिग बॉस 13' च्या 'वीकेंड के वार' मध्ये झळकणार आहे. स्पर्धकांना सुपर किक देण्यासाठी या शोमध्ये नवाज येणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आगामी 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. 'बिग बॉस' च्या मंचावर तो सिनेमाच्या प्रमोशनसाठी येत आहे.
सलमान आणि नवाजुद्दीनने 'किक' आणि 'बजरंगी भाईजान' या चित्रपटांच्या आठवणी जागवल्या. नवाजचा आगामी 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.