मुंबई - 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या यशस्वी सीझननंतर कलर्स मराठी आता बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. असे सर्वांचे आवडते महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी सीझन - २' चे सूत्रसंचालन करणार आहेत. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले होते. हा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का #BiggBossMarathi2 च्या घरात वर्दी? #ColorsMarathi #MaheshManjrekar pic.twitter.com/ZIzwRaZesm
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) April 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का #BiggBossMarathi2 च्या घरात वर्दी? #ColorsMarathi #MaheshManjrekar pic.twitter.com/ZIzwRaZesm
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) April 21, 2019शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का #BiggBossMarathi2 च्या घरात वर्दी? #ColorsMarathi #MaheshManjrekar pic.twitter.com/ZIzwRaZesm
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) April 21, 2019
महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले आहेत. बिग बॉसच्या प्रोमोमधुन 'मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे हे कवी मनाचे नेते, होतील का बिग बॉसचे विजेते, असा प्रश्न महेश मांजरेकर विचारताना दिसत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कोणत्या स्पर्धकांची वर्णी लागणार आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील, याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. काही नावांची एव्हाना चर्चा सुरू झाली असली तरीही अजून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
सध्या लोकसभा निवडणुकांमुळे सगळा माहौल बदलून गेला आहे. अशात फक्त मांजरेकर प्रोमोसाठी नेत्याच्या वेशभूषेत दिसतात की, सीझन होस्ट करताना हाच लूक कॅरी करतात याचीही उत्सुकता आहे. तसेही लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच. त्यातही बिग बॉसच्या घरात ९० दिवस कोणतेही राजकारण न करता टिकायचे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्यामुळेच मांजरेकर यांचा हा नवा लूक बिग बॉसच्या घरात त्यांचीच सत्ता असणार, हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे.