ETV Bharat / sitara

'भाग मिल्खा भाग' चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण, फरहानने दिला आठवणींना उजाळा - toofan

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली फरहानने 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. फरहानने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मिल्खा सिंग यांचे आयुष्य पडद्यावर उलगडण्यात तो यशस्वी ठरला होता.

'भाग मिल्खा भाग' चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण, फरहानने दिला आठवणींना उजाळा
author img

By

Published : Jul 12, 2019, 7:10 PM IST

मुंबई - अभिनेता फरहान अख्तरसाठी मैलाचा दगड ठरलेला 'भाग मिल्खा भाग' चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. हा चित्रपट फरहानच्या करिअरमधला हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत फरहानने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली फरहानने 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. फरहानने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. मिल्खा सिंग यांचे आयुष्य पडद्यावर उलगडण्यात तो यशस्वी ठरला होता. त्याच्यासाठी हा चित्रपट खूप खास ठरला होता. अभिनेत्री सोनम कपूरनेही त्याच्यासोबत या चित्रपटात भूमिका साकारली होती.

या चित्रपटाने माझे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकले होते, असे त्याने या पोस्टवर कॅप्शन देत चाहत्यांचे देखील आभार मानले आहेत. तर, सोनम कपूरनेही या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

फरहान 'भाग मिल्खा भाग'नंतर पुन्हा एकदा ओमप्रकाश मेहरांच्या 'तुफान' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो बॉक्सरच्या भूमिकेत दिसेल. त्यानंतर त्याचा 'स्काय इज पिंक' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. यामध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिदेखील त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसेल. ११ ऑक्टोंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर, 'तुफान' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.