ETV Bharat / sitara

बिग बॉस 14 : सलमानसोबत काम करण्याची सारा गुरपालने व्यक्त केली इच्छा - बिग बॉस लेटेस्ट अपटेड्स

पंजाबी गायिका सारा गुरपाल हिला भविष्यात सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. तसे झाले तर वेडी होईन असे ती म्हणते. सध्या ती बिग बॉसच्या १४ व्या पर्वाची स्पर्धक आहे.

BB 14
बिग बॉस 14
author img

By

Published : Oct 9, 2020, 12:53 PM IST

मुंबई - रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14'मध्ये सामील झालेली गायिका सारा गुरपालने सांगितले की, शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची ती खूप मोठी फॅन आहे. इतकेच नव्हे तर, सलमानबरोबर चित्रपटात काम करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली आहे. साराने सांगितले , "मला कधी सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर, मी वेडी होईन."

पंजाबी गायिका साराला तिच्या स्वतःच्या राज्यात केलेल्या कामाचा अत्यंत अभिमान आहे. ती म्हणते की, 'बिग बॉस'सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर ब्रेक मिळणे, ही एक मोठी गोष्ट आहे आणि याचे संपूर्ण श्रेय ती पंजाबी करमणूक उद्योगाला देते.

ती म्हणते, "आज मी जिथे आहे, ते फक्त पंजाबमुळे आहे. म्हणून राज्य माझ्यासाठी नेहमीच प्रथम क्रमांकावर राहील. लोक मला ओळखतात, कारण मी पंजाबमध्ये काम केले आहे. बिग बॉसमध्ये देखील या कामामुळेच आले आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.