अभिनेत्री हेमांगी कवी अलिकडे तिने फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. बाई, बुब्स आणि ब्रा असे शीर्षक असलेली पोस्ट तिने लिहिली होती. एकूणच आपल्या समाजात महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे त्यावर कडक प्रहार करणारी ही पोस्ट तिने लिहिली आहे. 'बाई बुब्स आणि ब्रा' ही पोस्ट शेअर करण्यामागचे कारण होते की अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर पोळ्या लाटतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर तिच्या शरीराकडे बघून अनेक कॉमेंट्सचा सामना तिला करावा लागला होता. त्यानंतर वैतागलेल्या हेमांगीने ही पोस्ट लिहिली होती.
"बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!" अशी सुरुवात तिने आपल्या पोस्टची केली आहे.
समाजात वावरत असताना महिलांना सतत स्वतःचे शरीर झाकायची अपेक्षा भोवती वावरणारे बाळगत असतात. यात तथाकथित संस्कारित, विचारवंतांपासून ते अगदी घरातील पुरुषांचाही समावेश असतो. यात त्या महिलेची होणारी घुसमट मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न हेमांगीने केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सध्या तिच्या या पोस्टवर सोशल मीडियात, समाज माध्यमांमध्ये भरपूर चर्चा सुरू आहे. काही जण यावरुन हेमांगीला ट्रोल करण्याचा प्रयत्नही करीत आहेत.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही या वादात उडी घेत हेमांगीच्या या भूमिकेबाबत प्रश्न चिन्हा उभा केलाय. जेव्हा आम्ही महिलांच्या हक्काविषयी भांडत होतो तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.
आता हेमांगीच्या या भूमिकेवर राजकीय भाष्यही यायला सुरुवात झाली आहे. ''सोशल मीडियावर काहीबाही कॉमेंट्स देतात त्याचा निषेध आहे. त्यावर सायबर क्राईम काय करते'', असा प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता याला टीकेला हेमांगी काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - .तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी