ETV Bharat / sitara

नकारात्‍मक भूमिका माझ्यासाठी डिटॉक्‍स ट्रीटमेंट सारखी असते : गुलशन ग्रोव्‍हर - Gulshan Grover in the second season of Your Honor

'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्‍हर यांनी सोनी लिव्‍हवरील सिरीज 'युअर ऑनर २'सह ओटीटीवर पदार्पण करत त्‍यांच्‍या करिअरला नवीन दिशा दिली आहे. प्रेक्षकांकडून कौतुक करण्‍यात येणा-या या सिरीजमध्‍ये त्यांनी त्‍यांचे सिक्रेट्स प्रकट करत करिष्‍माई उद्योगपती गुरजोत पन्‍नूची भूमिका साकारली आहे.

गुलशन ग्रोव्‍हर
गुलशन ग्रोव्‍हर
author img

By

Published : Dec 6, 2021, 10:01 PM IST

जेव्हा सामान्यतः चित्रपटात, नाटकात, मालिकेत वा वेब सिरीजमध्ये व्हिलन नसेल तर हिरोची भूमिका अधिक खुलून येते. मनोरंजनक्षेत्रात अनेक फेमस खलनायक होऊन गेलेत आणि आहेत. त्यात आघाडीवरील एक नाव म्हणजे गुलशन ग्रोव्‍हर. गुलशन ग्रोव्‍हरने आता वेब सिरीज ‘युअर ऑनर’ च्या दुसऱ्या पर्वात खलनायक म्हणून एंट्री घेतली आहे. शक्यतो सकारात्मक भूमिकांतून कलाकार काही घेऊन जात असतात परंतु गुलशन ग्रोव्हर मात्र आपल्या नकारात्मक भूमिकांतून शिकत असतात.

'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्‍हर यांनी सोनी लिव्‍हवरील सिरीज 'युअर ऑनर २'सह ओटीटीवर पदार्पण करत त्‍यांच्‍या करिअरला नवीन दिशा दिली आहे. प्रेक्षकांकडून कौतुक करण्‍यात येणा-या या सिरीजमध्‍ये त्यांनी त्‍यांचे सिक्रेट्स प्रकट करत करिष्‍माई उद्योगपती गुरजोत पन्‍नूची भूमिका साकारली आहे. विविध छटा व कणखर लूक असलेल्‍या त्‍यांच्‍या भूमिकेबाबत चाहत्‍यांमध्‍ये चर्चा आहे. तसेच खलनायकी भूमिका साकारण्‍यासाठी ओळखले जाणा-या या अभिनेत्‍याचे अशा नकारात्‍मक भूमिका साकारण्‍याबाबत अनोखे मत आहे. त्‍यांच्‍या मते, अशा भूमिका साकारणे त्‍यांच्‍यासाठी थेरपीसारखे आहे.

‘युअर ऑनर सीझन २'मध्‍ये गुलशन ग्रोव्‍हर यांनी टर्न टर्न गँगच्‍या गुन्‍हेगार मास्‍टरमाइण्‍डची भूमिका साकारली आहे, ज्‍याला बिशन खोसलाचे जीवन असह्य, घातक व जटिल करायला आवडते. गुरजोत पन्‍नूची भूमिका साकारण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना ते म्‍हणाले, ''माझा मुख्‍य उद्देश गोष्‍टी इतर पात्रांसाठी विलक्षण व असह्य करण्‍याचा असतो. चित्रपटसृष्‍टीमध्‍ये माझी खलनायक म्‍हणून प्रतिमा कायम आहे आणि सोनीलिव्‍हवरील सिरीज 'युअर ऑनर २' ओटीटी क्षेत्रामध्‍ये 'बॅड मॅन' म्‍हणून प्रवेश करण्‍यासाठी अगदी योग्‍य आहे.''

गुलशन ग्रोव्‍हर म्‍हणाले, ''नकारात्‍मक भूमिका साकारण्‍याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही, खरंतर त्‍यामधून मला आनंद मिळतो. अशा भूमिका थेरपी किंवा डिटॉक्‍स ट्रीटमेंट सारख्‍या आहेत. आध्‍यात्मिक उपायांमध्‍ये उल्‍लेख करण्‍यात आला आहे की तुम्‍ही दु:खी असाल तर ते व्‍यक्‍त करा. ते दु:ख तुमच्‍या मनामधून काढून टाका. याचप्रमाणे माझ्यासाठी नकारात्‍मक भूमिका साकारणे थेरपीसारखी राहिले आहे. यामधून मला पूर्णत: समाधान मिळते. शूटिंगनंतर मी खूपच शांत व आरामदायी असतो. अनेक कलाकार दावा करतात की, ते नकारात्‍मक भूमिका साकारतात तेव्‍हा शूटिंगनंतर देखील भूमिकेमध्‍येच गुंतून राहतात. मला हे पटत नाही. मी या मताच्‍या विरूद्ध आहे.''

ई निवासचे दिग्‍दर्शन, स्‍फेअर ओरिजिन्‍स सहयोगाने अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट निर्मित 'युअर ऑनर २' ही इस्रायली सिरीज 'केवोडो'चे अधिकृत रूपांतरण आहे. या रोमांचक कोर्टरूम ड्रामामधील जिम्‍मी शेरगिल व गुलशन ग्रोव्‍हर यांच्‍यातील आमना-सामना पाहायला मिळतोय सोनीलिव्‍हवर.

हेही वाचा - Vickat Wedding: कॅटरिनाची बहिण नताशा राजस्थानात पोहोचली, सुरू झाली पाहुण्यांची लगीनघाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.