ETV Bharat / sitara

‘बाप पांडुरंग’ रॅप सॉंग, विठ्ठलवारीला मिळालेला ‘मॉडर्न टच’!

रॅप सॉंग म्हटलं की तरुणाईचे लगेच लक्ष वेधले जाते. अशाच एका रॅप सॉंगची सध्या धूम आहे, ते म्हणजे 'खास रे टीव्ही'च्या विठ्ठलावर तयार केलेल्या 'बाप पांडुरंग' या गाण्याची. 'बाप पांडुरंग' या रॅप सॉंगमध्ये विठ्ठल व वारकरी यांचे असलेले नाते यावर भाष्य केलेले आहे.

‘Baap Pandurang’ rap song
‘बाप पांडुरंग’ रॅप सॉंग
author img

By

Published : Jul 21, 2021, 5:46 PM IST

कोरोनामुळे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यावर बंधनं आणली गेली. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी पंढरपूरच्या वारीवर गदा आली. परंतु विठ्ठलावरील भक्तीमध्ये तसूभरही कमतरता जाणवली नाही. या भक्तीचाच एक भाग वेगळ्या रीतीने समाजासमोर आलाय. विठ्ठल वारीवर आधारित ‘बाप पांडुरंग’ असे एक रॅप सॉंग बनविण्यात आले आहे जेणेकरून आईच्या तरुणाईलासुद्धा विठ्ठलभक्तीमध्ये सामावून घेता येईल. रॅप सॉंग म्हटलं की तरुणाईचे लगेच लक्ष वेधले जाते. अशाच एका रॅप सॉंगची सध्या धूम आहे, ते म्हणजे 'खास रे टीव्ही'च्या विठ्ठलावर तयार केलेल्या 'बाप पांडुरंग' या गाण्याची. 'बाप पांडुरंग' या रॅप सॉंगमध्ये विठ्ठल व वारकरी यांचे असलेले नाते यावर भाष्य केलेले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बाप पांडुरंग' हे विठ्ठल व वारकरी यावर बनवलेले हे पहिलेच रॅप सॉंग आहे. हे रॅप सॉंग निरंजन पेडगावकर (निरू), संजा, वैभव चव्हाण, रॉकसन यांनी लिहिले आणि गायले आहे. या तिघांसह सुमारे ४० ते ५० कलाकार घेऊन चित्रित करण्यात आलेल्या आणि घर बसल्या वारीचा आनंद देणाऱ्या या रॅप सॉंगचे दिग्दर्शन विशाल सांगळे व संजा यांनी केले आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन निरंजन पेडगावकर (निरु) यांनी केले असून ते बनवताना टीमला शिवशंभो भजनी मंडळाचे (घिसरेवाडी) मोठे सहकार्य लाभले.

‘Baap Pandurang’ rap song
‘बाप पांडुरंग’ रॅप सॉंग

'खास रे टीव्ही' नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. 'ट्रम्प तात्या' यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास 'पाब्लोशेठ', 'बायडेन बापू' , 'एलोन मस्क', 'थेट भेट' या बरोबरच "चहा प्या", "गावरान मुंडे" आणि "उसाचा रस" या सारख्या नाविन्यपूर्ण गाण्यांपर्यंत अव्याहत सुरु आहे. यातील "उसाचा रस" हे गाणे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट देखील केले होते. बोपदेव घाट, भिवरी गाव व पुण्यातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण आणि विठ्ठलावर तयार केलेल्या या पहिल्या रॅप सॉंगची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

‘Baap Pandurang’ rap song
‘बाप पांडुरंग’ रॅप सॉंग

या गाण्याविषयी बोलताना निर्माते नरेंद्र फिरोदिया म्हणाले "कोरोनामुळे मागील वर्षी वारी झाली नाही व यावर्षी देखील खूप कमी लोकांना वारीत जाण्याची परवानगी मिळाली आहे. 'खास रे टीम'ने विठ्ठलावर केलेले रॅप साँग एक अनोखा प्रयोग आहे कारण हे नेहमीच्या पठडीतलं रॅप सॉंग नाही. आषाढी वारीचे आपल्या महाराष्ट्रात खूप महत्वाचे स्थान आहे. या गाण्याद्वारे या टीमने विठ्ठलाचे एक नवे रूप आपल्यासमोर सादर केले आहे. या गाण्याने लोकांना विठ्ठल दर्शनाची अनुभूती होईल आणि 'बाप पांडुरंग' हे गाणं सर्वांना नक्की आवडेल."

हेही वाचा - राज कुंद्राने माझे फोटोज आणि व्हीडिओज बेकायदेशीररित्या वापरले - पूनम पांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.