मुंबई - फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीत मानाने स्थान पटकावून आहे. त्याला भारताचा ‘ऑस्कर’ म्हणूनसुद्धा संबोधिले जाते. प्रत्येक कलाकाराचे, पडद्यावरील वा पडद्यामागील, स्वप्न असते हा पुरस्कार मिळविण्याचे. गेल्या पाच वर्षांपासून फिल्मफेअरने खास मराठी चित्रपटसृष्टीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मराठी सुरु केले व हल्लीच, मीडिया आणि प्रेक्षकाविना, हा सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन अमेय वाघ, सिध्दार्थ जाधव आणि मोनिका मुर्ती यांनी केले. त्यांनी आपल्या खास विनोदी आणि मनमोकळ्या शैलीत प्रेक्षकांना मनुमुराद हसवत सोहळा संस्मरणीय बनविला.
परिणीती चोप्राची आकर्षक व खास उपस्थिती या जादुई संध्येमध्ये अनेक मराठी सुपरस्टार कलाकारांनी दिमाखदार परर्फार्मन्सही सादर केला. वैभव तत्ववादीने हिट मराठी गाण्यांवर आपल्या नृत्यकलेचे सादरीकरण केले. मानसी नाईकने नोरा फतेहीची चार्टबर्स्टर्स नृत्ये हुबेहुब साकारली. अमृता खानविलकरने माधुरी दिक्षीतच्या एव्हरगी्रन गीत नृत्यांना नव्याने उजाळा देत आपले कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले. दुसरीकडे सोनाली कुलकर्णीने शाहरुख खानसह इतर अभिनेत्यांना सन्मान वाहणारे अनोखे सादरीकरण केले. पूजा सावंत आणि गष्मीर महाजनी यांनी हिट रोमँटिक गाण्यांवर पदलालित्य दाखवून आपल्यातील अविश्वसनीय केमिस्ट्री दाखवून दिली.
फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० मध्ये ‘आनंदी गोपाळ’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल ११ ‘ब्लॅक लेडीज’ जिंकल्या. दीपक डोबरियाल आणि मुक्ता बर्वे यांनी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावले, तर समीर विद्वंस ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. शशांक शेंडे, नीना कुलकर्णी, डॉ. सलील कुलकर्णी, शुभंकर तावडे, शिवानी सुर्वे, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी आदींनाही ‘ब्लॅक लेडी’ मिळाली. आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर खारी बिस्किट साठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार ठरले. एक्सलन्स इन सिनेमा हा स्पेशल पुरस्कार महेश कोठारे यांना प्रदान करण्यात आला.
फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० गेल्या सहा दशकांपासून फिल्मफेअर विविध पुरस्कार सोहळा उत्सवांच्या माध्यमातून भारतीय चित्रपट उद्योगामधील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि प्रदर्शनांचा गौरव आणि सत्कार करण्यामध्ये सतत अग्रेसर आहे. मराठी चित्रपट उद्योगासाठी २८ फेब्रुवारी ही तारीख संस्मरणीय राहील. मुंबईमधील सेंट अँड्यू ऑडिटोरियममध्ये आयोजित ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत पाचव्या फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० सोहळ्यात पुन्हा एकदा ब्लॅक लेडी अवतरुन सर्वोत्कृष्ट प्रदर्शनांवर मेहरबान झाली. हा सोहळा जल्लोषात संपन्न झाला
फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे-विज, मृणाल कुलकर्णी, नीना कुलकर्णी, निशीगंधा वाड यांनीही आपल्या सदाबहार सौंदर्याने सोहळ्याचे रेड कार्पेट आणखी चमकदार बनवले. मानसी नाईक, क्रांती रेडकर-वानखेडे, पूजा सावंत, सई देवधर, अमृता खानविलकर, अमृता सुभाष, श्वेता शिंदे, मंजिरी ओक, रुपाली भोसले, वर्षा उसगावकर, मुक्ता बर्वे, आदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी, मिथीली पालकर यांच्यासारख्या लोभस सौंदर्यवती अभिनेत्रींनी त्यांच्या दिलखेचक पेहराव आणि स्टाईलच्या माध्यमातून समारंभाची शोभा वाढवली.
फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० पुरुषांमध्ये गष्मीर महाजनी, प्रसाद ओक, पुष्कर जोग, शुभांकर तावडे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, शरद केळकर, वैभव तत्ववादी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह राकट डब्ल्यूबीसी पैलवान प्रदीप खरेरा आणि लेख़क निरंजन अय्यंगार यांनीही हजेरी लावली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह गायक आदर्श शिंदे, संगीतकार अनू मलिक यांनीही हा पुरस्कार सोहळा संस्मरणीय बनवण्यात आपले योगदान दिले.
फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२० बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही आपल्या आकर्षक सौंदर्यातून या सोहळ्याचे खास आकर्षण बनली होती. तिने आपल्या छोटेखानी ‘दोन शब्दात’ सर्वांचे मन व हृदय जिंकले. हेही वाचा -
"ऑल द बेस्ट व्हिलन" म्हणत टायगरने दिशा पाटनीला पाठवला संदेश