ETV Bharat / sitara

अखेर असे वाटायला लागलंय की ही माझी वेळ आहे - पंकज त्रिपाठी - Pankaj Tripathi at the peak of popularity

अभिनेता पंकज त्रिपाठी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याचे नाव जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या किंवा वेब सिरीजच्या क्रेडिट लिस्टमध्ये असते तेव्हा त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झालेला असतो. आपल्याला इथवर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागल्याचे त्याने सांगितले आहे.

Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी
author img

By

Published : Dec 9, 2020, 7:45 PM IST

मुंबई - अभिनेता पंकज त्रिपाठी ओटीटी विश्वात एक सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. तो पारंपारिक, पुराणमतवादी चांगल्या दिसण्याच्या प्रमाणात बसत नाही किंवा पारंपारिक नायकाच्या प्रतिमेतही बसत नाही. तथापि, प्रत्येक वेळी जेव्हा त्याचे नाव नवीन शोच्या क्रेडिट लिस्टमध्ये दिसते तेव्हा चाहते उत्साहीत होतात. पंकज त्रिपाठीने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या विविध शोजला दिले आहे, तो म्हणतो की या स्थानावर पोहोचण्यासाठी त्याला खूप परिश्रम करावे लागले आहेत.

यावर्षी त्याने मोठ्या पडद्यावर 'अंग्रेजी मीडियम' व्यतिरिक्त 'मिर्झापूर 2', 'लुडो', 'एक्सट्रॅक्शन', आणि 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' यासारख्या विविध चित्रपटांत आणि वेब मालिकांमध्ये अभिनेता म्हणून आपली कला दाखविली आहे.

तो म्हणाला, "शेवटी मला वाटू लागलं आहे की हा माझा वेळ आहे आणि तो कधीच निघून जाऊ शकत नाही. मला प्रेक्षकांना एकामागून एक संस्मरणीय चित्रपट द्यायचे आहेत, एकामागून एक नेत्रदीपक भूमिका साकारायच्या आहेत. जगाचे मनोरंजन करावे ही बऱ्याच काळापासूनची इच्छा होती आणि मला एक विलक्षण काम करावेसे वाटते. "

भूतकाळाची आठवण करून देत तो म्हणाले की ते इतके सोपे नव्हते. पंकज त्रिपाठी म्हणाला, "एक काळ असा होता की जेव्हा काम फारच कमी होते आणि बऱ्याच काळानंतर मिळायचे. मी जर लायक असेन तर कॅमेऱ्याच्या समोर राहण्यासाठी आणि तशा संधी मिळवण्यासाठी धडपडत होतो. आता मी खूप समाधानी आहे आणि खूप आभाराची जाणीव ठेवून आहे. या स्थानावर पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.''

हेही वाचा - नेटफ्लिक्सच्या 'एके व्हर्सेस एके'मधील गणवेशावर आणि भाषेवर वायू दलाचा आक्षेप

तो पुढे म्हणाला, "२०२० हे वर्ष जगासाठी एक क्रूर आठवण देणारे होते, परंतु माझ्या कारकीर्दीला आकार मिळाला होता, तोपर्यंत माझ्याकडे कृतज्ञतेशिवाय दुसरे काहीही नाही.''

हेही वाचा - तापसीच्या 'बिग्गीनी' व्हिडिओची दीपिका पदुकोण बनली 'प्रचंड फॅन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.