ETV Bharat / sitara

केरळची आर्यनंदा बाबू ठरली  ‘झी सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची महाविजेती! - Aryananda Babu, a 12-year-old singer from Kerala

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची ११ ऑक्टोबर रोजी भव्य अंतिम फोरी पार पडली. यामध्ये केरळमधून आलेली १२ वर्षांची अतिशय गुणी गायिका असलेल्या आर्यनंदा बाबू विजेती ठरली. यामुळे तिने मानाचा चषक तर जिंकलाच, पण तिला बक्षिसापोटी पाच लाख रुपये रोख रक्कमही देण्यात आली.

'Zee Sa Re Ga Ma Pa Little Champs
आर्यनंदा बाबू ठरली ‘झी सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची महाविजेती
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:22 PM IST

मुंबई - गेले अनेक महिने ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’मधील बालस्पर्धकांनी आपल्या असामान्य गायनकौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी या गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाच्या आठव्या आवृत्तीची अखेरची फेरी पार पडली. या भव्य अंतिम फेरीसाठी बॉलीवूडचे नामवंत अभिनेते जॅकी श्रॉफ, गोविंदा आणि शक्ती कपूर हे उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या अंतिम फेरीत ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या या आवृत्तीच्या विजेतेपदाचा मुकुट केरळमधून आलेल्या १२ वर्षांची अतिशय गुणी गायिका असलेल्या आर्यनंदा बाबू हिच्या मस्तकावर चढविण्यात आला. यामुळे तिने मानाचा चषक तर जिंकलाच, पण तिला बक्षिसापोटी पाच लाख रुपये रोख रक्कमही देण्यात आली. रनिता बॅनर्जी आणि गुरूकीरत सिंग या दोन बालस्पर्धकांनीही त्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा यशस्वी मुकाबला केला, पण त्यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतिय विजेते घोषित करण्यात आले.

'Zee Sa Re Ga Ma Pa Little Champs
आर्यनंदा बाबू ठरली ‘झी सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची महाविजेती
विजयी घोषित केल्यामुळे हर्षभरित झालेली आर्यनंदा म्हणाली, “या विजयामुळे माझं खरोखरीच एक स्वप्न पूर्ण झालं आहे! सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मी खूप काही शिकले. माझ्यातील सुप्त गायिकेला नेहमी मदत करून आणि प्रोत्साहन देऊन माझं मनोबल उंचावल्याबद्दल मी सर्व परीक्षक आणि ज्यूरी सदस्यांची आभारी आहे. आता या स्पर्धेचा शेवट होत असला, तरी मी या काळात मी मिळविलेल्या नव्या मित्रांना आणि यात मला जे शिकायला मिळालं, ते ज्ञान मी विसरणार नाही आणि परीक्षक आणि या ज्यूरी सदस्यांशी मी जे संबंध निर्माण केले आहेत, ते मी कायम राखीन. मला माझ्यातील गायनकला सादर करण्याची ही संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद झाला असून ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी झी टीव्ही वाहिनी आणि सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ यांची अतिशय आभारी आहे.”आर्यनंदाने ही स्पर्धा जिंकल्याबद्दल परीक्षक अलका याज्ञिक म्हणाल्या, “अगदी सुरुवातीपासूनच आर्यनंदा ही एक तल्लख गायिका राहिली असून संपूर्ण स्पर्धेत सतत अफलातून गाणी गाऊन तिने आम्हाला पूर्ण प्रभावित केले होते. या मंचावर आजवर आलेल्या सर्व सर्वोत्तम स्पर्धकांपैकी ती एक असून तिचं प्रत्येक गाणं हे अगदी निर्दोष होतं. आर्यनंदाचं मी मनापासून अभिनंदन करते. तसंच अतिशय कडव्या स्पर्धेला तोंड देत उपविजेते राहिलेल्या रनिता आणि गुरूकीरत यांचंही मी अभिनंदन करते. ते उत्कृष्ट गायक बनतील, हे त्यांनी सिध्द केलं आहे. ही सर्व स्पर्धाच एक आनंददायक अनुभव होती आणि या सर्व स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा!”त्यांना दुजोरा देताना परीक्षक हिमेश रेशमिया म्हणाले, “आर्यनंदाचा हा विजय आणि तिने या स्पर्धेदरम्यान दाखविलेली अफलातून गायनकला ही ज्यांनी अद्याप स्वत:तील सुप्त गायनकौशल्य ओळखलेलं नाही, अशा सर्व अनेक मुलांसाठी प्रेरणादायक ठरेल. या स्पर्धेत विजयी होण्याची तिची महत्त्वाकांक्षा आणि उत्साह हा तिने सासत्यपूर्ण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीतून दिसून येत होता. देवाने तिच्या प्रार्थनेचा स्वीकार केला, हे पाहून मला आनंद होत आहे. असं असलं तरी, या स्पर्धेतील प्रत्येक स्पर्धक हा एक विजेताच आहे, असं मी मानतो. त्यांच्या भावी यशाचा हा केवळ प्रारंभ आहे. त्यांना उज्जवल भविष्यकाळ लाभो. भविष्यात मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी, ही शुभेच्छा!”परीक्षक जावेद अली म्हणाले, “आर्यनंदाने या स्पर्धेत अनेकदा अप्रतिम गाऊन आम्हाला थक्क केलं होतं. या सर्व स्पर्धकांमध्ये ती एक शक्तिशाली स्पर्धक होती आणि ही स्पर्धा जिंकण्याच्या तिच्या निर्धारानेच तिला यात विजयी केलं, असं मला वाटतं. तिला भरपूर उज्ज्वल भविष्यकाळ आहे, असं मला वाटतं आणि ती ज्यात पाऊल टाकेल, त्या क्षेत्रात ती निश्चितच यशस्वी होईल. तिला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!”‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ची ही अंतिम फेरी म्हणजे भरलेला मनोरंजनाचा खजिना होता. या अंतिम फेरीची सुरुवात सात अंतिम स्पर्धकांच्या जोरदार गाण्यांनी झाली. या स्पर्धेसाठी हे सर्व स्पर्धक शेवटचे एकत्र आले आणि त्यांनी अफलातून गाणी सादर केली. यावेळी अलका याज्ञिक, हिमेश रेशमिया आणि जावेद अली या परीक्षकांनीही मंचावर त्यांना साथ दिली, तेव्हा सर्व ज्यूरी सदस्य आणि प्रेक्षकांनी टाळ्या आणि घोषणा देत त्यांना पाठिंबा दिला. यावेळी जावेद अली यांनी नामवंत संगीतकार ए. आर. रेहमान यांना गाण्यांतून वाहिलेली आदरांजली हा या अंतिम फेरीचा ठळक विशेष राहिला. त्याशिवाय जॅकी श्रॉफ, गोविंदा आणि शक्ती कपूर या हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार सुपरस्टारनी या क्षेत्रातील आणि आपल्या कारकीर्दीतील काही अज्ञात पण रंजक किस्से सांगून वातावरणात रंग भरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.