'आर्या'चा दुसरा सीझन (Arya s second season), आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या शत्रूंपासून गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेशी लढणाऱ्या आईच्या प्रवासाने सुरू होईल. तिचे कुटुंबच तिची ताकद बनेल की तिचे विश्वासूच तिच्या विरोधात उभे राहतील हे या भागात अनुभवायला मिळेल. ‘आर्या’ ने सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी आंतरराष्ट्रीय एमी नामांकन मिळविले आहे. 'आर्या' मनोरंजक थ्रिलर ( Arya entertaining thriller)होताच पण 'आर्या २' मध्ये त्याची पातळी उंचावलेली असेल. 'आर्या २' डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा येत आहे. ट्रेलरमधील अनेक मनोरंजक ट्विस्ट्समुळे या सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'आर्या'चा दुसरा भाग रिलीज होण्याआधी, राम माधवानी (Ram Madhavani) यांनी दोन्ही सीझनचे खास घटक शेअर केले. ते म्हणाले, "आर्या १ आणि आर्या २ मधील ‘सिग्नेचर एलिमेंट’ म्हणजे नैतिक निवड आणि आर्या सामना करत असलेला नैतिक संघर्ष. पहिल्या भागात, तिला आपल्या मुलांचे संरक्षण करायाचे होते. तिने तिच्या वडिलांना तुरुंगात पाठवले आणि मुलगी किंवा बायको पेक्षाही तिने 'आई' हा पर्याय निवडला. हा तिचा मोठा संघर्ष होता. सीझन २ मध्ये, पुन्हा नैतिक संघर्ष आहे. ट्रेलरमध्ये ती परत आल्याचे दिसत आहे. आता ती इथून पुन्हा निघून जाणार आहे का, तिचे पुढे काय होणार आहे, आता ती कशाची निवड करणार आहे यामध्ये नैतिक संघर्ष आहे आणि त्यामुळे नाट्य आणि तणाव निर्माण होतो."
दिग्दर्शक राम माधवानी पुढे म्हणाले, “फॉर्मबाबत बोलायचे झाल्यास, आम्ही सर्व काही ३६० मध्ये शूट केले आहे. मला तीन-चार कॅमेरे वापरायला आवडत नाहीत. मी सर्व कलाकारांसोबत सहज होतो. मला वाटते की सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखा माहित होत्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी म्हणेन की हा एक बोनस होता. त्यांना त्यांची पात्रे इतकी चांगली माहीत होती की त्यांच्यासोबत काम करणे खूप आनंददायक होते."
सुष्मिता सेन आर्या सरीनच्या जबरदस्त (Sushmita Sen in the strong role of Arya Sareen) भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत सिकंदर खेर, विकास कुमार, मायो साराव, अंकुर भाटिया, आकाश खुराना, दिलनाज इराणी हे महत्वपूर्ण भूमिकांत दिसतील.
‘आर्या २’ स्ट्रीम होऊ लागेल १० डिसेंबर २०२१ पासून डिस्ने+ हॉटस्टारवर.
हेही वाचा - प्रियंकाचा पती निक जोनाससह ठुमकताना दिसणार नोरा फतेही, वाचा कुठे...