ETV Bharat / sitara

खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानी ठरला विजेता, आता ग्रँड फिनालेच्या टेलिकास्टची प्रतीक्षा - Arjun Bijlani became the winner

अभिनेता अर्जुन बिजलानीने स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'चा अकरावा सीझन जिंकला आहे. याचे संपूर्ण शूटिंग काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाले होते. अंतिम भाग 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानी ठरला विजेता

author img

By

Published : Sep 22, 2021, 3:14 PM IST

मुंबई - अभिनेता अर्जुन बिजलानीने स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'चा अकरावा सीझन जिंकला आहे. त्याने दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, वरुण सूद, विशाल आदित्य सिंग आणि राहुल वैद्य यांचा पराभव करून विजेतेपदाचा करंडक जिंकला.

'खतरों के खिलाडी 11' चे संपूर्ण शूटिंग काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाले होते आणि मंगळवारी त्याचा शेवटचा भाग मुंबईत चित्रीत करण्यात आला. यात अर्जुनला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

अंतिम भाग 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी कलर्स टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. चॅनलने अद्याप विजेत्याचा तपशील जाहीर केला नसला तरी, अर्जुनची पत्नी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला आहे.

इंस्टाग्रामवर अर्जुनची पत्नी नेहा स्वामी बिजलानीने लिहिलंय, "मला तुझा खूप अभिमान वाटतो जान ... तू खरोखरच काय केलंयस ते मला माहिती आहे. या जगातील सर्व आनंदासाठी तू पात्र आहेस, अर्जुन."

तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॉफीचे छायाचित्र देखील पोस्ट केले आहे. अर्जुनने आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. 'खतरों के खिलाडी'चे इतर स्पर्धकही यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - बीचवरील आठवणीत रमली जान्हवी कपूर, तर मौनी रॉयचे उफाळून आले साडी प्रेम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.