ETV Bharat / sitara

'शेवंता' म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचं नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन - मालिका 'तुझं माझं जमतंय

'रात्रीस खेळ चाले- २'मधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा एका मादक व्यक्तिरेखेत टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती 'पम्मी' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

apoorva-nemalekar
अपूर्वा नेमळेकर
author img

By

Published : Oct 9, 2020, 4:13 PM IST

मुंबई - 'रात्रीस खेळ चाले- २'मधील शेवंता या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. शेवंताच्या अदांवर संपूर्ण महाराष्ट्र भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षक शेवंताला खूप मिस करत आहेत. पण शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा एका मादक व्यक्तिरेखेत टीव्हीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'झी युवा'वरील आगामी मालिका 'तुझं माझं जमतंय'मध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अपूर्वा 'पम्मी' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'पम्मी' या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या मालिकेची शैली विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडक देणार आहे. मात्र ही मालिका नक्की काय आहे..? आणि मालिकेतल्या जोडीच्या आयुष्यात ही पम्मी एन्ट्री घेऊन नक्की काय धमाल करणार आहे, ते मात्र ही मालिका सुरू झाल्यावरच आपल्याला कळेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.