मुंबई - अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूरने आपला वाढदिवस बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यासमवेत मुंबईत तिच्या घरी साजरा केला. अंशुलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कपूर सिस्टर्स यांनी एकत्र आनंद उत्सव साजरा केल्याचे दिसते.
बर्थडे गर्ल अंशुलाने जान्हवी आणि खुशीसाठी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक हृदयस्पर्शी पोस्ट देखील लिहिली आहे.
अंशुला नेहमी २९ डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. मात्र तिच्या बहिणी जान्हवी आणि खुशीने काल रात्रीच आनंदोस्तव साजरा करायला सुरुवात केली आणि त्या बर्थडे गर्लच्या भेटीसाठी आल्या. अचानक सुरू झालेल्या या सेलिब्रेशनने अंशुलाही चकित झाली. या बहिणींनी साजरा केलेल्या वाढदिवसाची झलक या विहडिओत पाहायला मिळते. तिने बहिणींचे आभारही मानले आहे.
हेही वाचा - राजकीय पक्ष लॉन्च करणार नाही, रजनीकांत यांची माहिती