ETV Bharat / sitara

सोनम कपूरच्या 'झोया फॅक्टर'मध्ये अंगद बेदीचीही मुख्य भूमिका, फर्स्ट लूक आऊट - दुलकर सलमान

'झोया फॅक्टर' हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारित आहे. सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तर,  चित्रपटात अंगद बेदी हा क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

सोनम कपूरच्या 'झोया फॅक्टर'मध्ये अंगद बेदीचीही मुख्य भूमिका, फर्स्ट लूक आऊट
author img

By

Published : Aug 27, 2019, 9:00 PM IST

मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर हिच्या आगामी 'झोया फॅक्टर'चा टीझर काहीच दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सोनमची झलक पाहायला मिळाली. आता यामधील एकेक कलाकाराचा फर्स्ट लूक प्रदर्शित होत आहे. अभिनेता अंगद बेदीची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

'झोया फॅक्टर' हा चित्रपट अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारित आहे. सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तर, चित्रपटात अंगद बेदी हा क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

आपल्या भूमिकेबाबत अंगदने सांगितले, की 'रॉबिन हा एक चार्म बॉय आहे. तोच टीमचा सुपरस्टार आहे. त्याच्यामध्ये एकप्रकारचा अॅटीट्युडदेखील पाहायला मिळेल. त्याच्या खेळाशीही तो जीद्दी असतो. त्यामुळे ही भूमिका साकारणं माझ्यासाठी एक चांगली संधी होती'.

'झोया फॅक्टर'चा ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ ऑगस्टरोजी हा ट्रेलर प्रदर्शित होईल.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.