ETV Bharat / sitara

शहनाझची आर्त स्वरात सिध्दार्थला हाक, गायले भावूक गाणे - death of Siddharth

सिद्धार्थशुक्लाचे निधन 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले होते. त्याच्या आठवणीने त्याची खास मैत्रीणी शहनाझ गील व्याकुळ झालेली दिसत आहे. सिध्दार्थ आणि तिच्या जोडीला लोक सिडनाझ या नावानेच ओळखत होते. यातील सिड निघून गेल्याने नाझच्या एकटेपणाने शहनाझ भावूक झालेली दिसली.

सिध्दार्थच्या आठवणीत शहनाझ भावूक
सिध्दार्थच्या आठवणीत शहनाझ भावूक
author img

By

Published : Sep 22, 2021, 7:10 PM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे चाहतेही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्याच्या आठवणीने त्याची खास मैत्रीणी शहनाझ गील व्याकुळ झालेली दिसत आहे. सिध्दार्थ आणि तिच्या जोडीला लोक सिडनाझ या नावानेच ओळखत होते. यातील सिड निघून गेल्याने नाझच्या एकटेपणाने शहनाझ भावूक झालेली दिसली.

सिध्दार्थच्या आठवणीत शहनाझ भावूक

सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात ती एक पंजाबी गाणं गात खूप दु:खी स्वरात गाताना दिसते. हा व्हिडीओ शहनाजच्या एका फॅन क्लबने पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओवर भरपूर कॉमेंट्स तिला मिळत असून अनेकांनी तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केलाय. अनेक जण या दुःखातून तिला सावरण्याचा सल्ला देत आहेत. सिद्धार्थचे निधन 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले होते.

शहनाझची आर्त स्वरात सिध्दार्थला हाक

तू माझ्यापासून दूर का गेलास? असा सवाल शहनाझ व्याकुळ होऊन या गाण्यातून विचारताना दिसते. ती या व्हिडीओमधून स्वत:ला सांभाळायचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सिध्दार्थ आणि शहनाझ यांची मैत्री सर्वश्रृत आहे. त्यांच्यात खूप चांगले बाँडिंग होते. 2019 मध्ये शहनाज आणि सिद्धार्थ या जोडीला रिअॅलिटी शो बिग बॉस 13मध्ये प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. त्याकाळात 'सिडनाझ' हा ट्रेंड ट्विटरवर गाजला होता. ही जोडी तुटल्याची चर्चा मनोरंजन जगतात आहे.

हेही वाचा - Kbc 13: अमिताभ बच्चनने दाखवली अभिषेक आणि आराध्याने दिलेली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.