ETV Bharat / sitara

'मै तेरी बन जाऊंगी', अमृता फडणवीसांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित - फिर से

काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे अमृता यांच्या आवाजातील 'मै तेरी बन जाऊंगी' हे गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

'मै तेरी बन जाऊंगी', अमृता फडणवीसांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:45 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्या गायनाच्या आवडीबद्दल सर्वांना माहिती आहे. बऱ्याच कार्यक्रमांमधुन, अल्बममधुन त्यांचे गाण्याबद्दलचे प्रेम नेहमीच दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

'कबिर सिंग' चित्रपटातलं 'मै तेरा बन जाऊंगा' या गाण्याचं फिमेल व्हर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. या गाण्यात त्यांच्या ग्लॅमरस अंदाजासोबतच आवाजाची जादूही प्रेक्षकांवर भूरळ पाडणारी आहे. या गाण्याला आत्तापर्यंत लाखो व्हिव्ज मिळाले आहेत. अमृता यांच्या आवाजाची प्रेक्षक भरभरुन कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या गायनाची प्रशंसाही होत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे अमृता यांच्या आवाजातील मै तेरी बन जाऊंगी हे गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

अमृता यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. फार कमी जणांना माहिती असेल की त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहे. त्यांच्या वडिलांनीच त्यांना गायनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या आवाजाची जादू या गाण्यात पाहायला मिळते.

अमृता यांचा हा पहिलाच अल्बम नाहीये. यापूर्वीही त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'फिर से' गाण्यात स्क्रिन शेअर केली आहे. हे गाणे देखील त्यांनीच गायले होते. या गाण्यात त्यांना डान्सही सादर केला होता.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.