ETV Bharat / sitara

'मिर्झापूर 2'मध्ये भूमिका मिळाली, तेव्हा अमिका शैल झाली भावूक

author img

By

Published : Oct 22, 2020, 4:31 PM IST

'मिर्झापूर 2' या वेब सीरिजमध्ये गायक आणि अभिनेत्री अमिका शैल भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्या कास्टिंगची खात्री झाली, तेव्हा ती खूप भावूक झाली होती. हा क्षण तिने सर्वांसमवेत शेअर केला आहे.

Amika Shell
अमिका शैल

मुंबई - गायक आणि अभिनेत्री अमिका शैल आगामी ‘मिर्झापूर 2’ या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्या कास्टिंगची खात्री झाली, तेव्हा ती खूप भावूक झाली होती. हा क्षण तिने सर्वांसमोर शेअर केला आहे.

ती म्हणाली, "मिर्झापूर'मध्ये मी सहभागी असल्याची बातमी ऐकून मी खूप भावनिक झाले. मी याचा पहिला भाग २०१८ मध्ये पाहिला होता आणि जगभरातील इतर प्रेक्षकांप्रमाणे मीही आनंद घेतला होता. या शोचा मी भाग होणे, जादुई होते. सेटवरील पहिला दिवस उत्साह वाढवणारा होता. विशेषत:, जेव्हा जेव्हा मी कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी), गुड्डू (अली फजल) आणि मुन्ना (दिव्येंदु) पाहिले. "

या शोमध्ये अमिका एक गायक म्हणून मुख्य भूमिका करीत आहे. ती म्हणाली, "गायकाची भूमिका साकारणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे, ते एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. मला स्टारकास्ट आणि क्रू टीमबरोबर काम करायला आवडले. पंकजजी यांचा अभिनय पाहून मला खूप काही शिकायला मिळालं. एक कलाकार म्हणून त्यांचा दृष्टिकोन आश्चर्यकारक आहे. मला विश्वास आहे की, ईश्वराने यावर्षी माझ्यासाठी दिवाळीची आधीपासूनच योजना आखली होती. "

वयाच्या नऊव्या वर्षी तिने 'लिटल चॅम्प्स' या रिअॅलिटी शोमध्ये गायक म्हणून प्रवास सुरू केला. 'मॅडम सर', 'लाल इश्क', 'अभय', 'बालवीर रिटर्न्स' आणि 'उडान' यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे.

ती म्हणाली, "एका महिन्यातच माझे दोन शो आणि एका चित्रपटाचा प्रीमियर होत आहे. 'गंदी बात 5' (वेब ​​सीरिज) चांगलीच गाजली आहे आणि आता मी 'मिर्झापूर2' रिलीज होत आहे. त्यानंतर 'लक्ष्मी बॉम्ब' येईल. 'मिर्झापूर 2' माझ्यासाठी संस्मरणीय आहे, या शोमध्ये एक गायिका म्हणून मी काम केले आहे, जिचे मुन्ना भैया अपहरण करतो. "

करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा निर्मित 'मिर्झापूर 2' या शोच्या दुसर्‍या सीझनमध्ये ईशा तलवार, विजय वर्मा, कुलभूषण खरबंदा, राजेश तैलंग, मेघना मलिक यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

'मिर्झापूर 2' २३ ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर सुरू होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.