मुंबई - अभिनेत्री आलिया एफ तिच्या 'कम्फर्ट झोन' मधून बाहेर आली आणि मजेदार डान्स केला. डान्सचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "पेन्सिल टाचांमध्ये कट न करता मजेदार कोरिओग्राफी करण्याचा प्रयत्न केला, कन्फर्ट झोनपासून स्वत: ला थोडेसे दूर केले."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिची ही शैली अनेक चाहत्यांनी पसंत आली असून भरपूर प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. अत्यंत सफाईने तिने डान्स स्टेप केल्या आहेत.
'जवानी जानेमन' या चित्रपटामुळे प्रसिध्दी झोतात आलेल्या अभिनेत्री आलियाने स्वतःलाच आव्हान दिले आहे. आपण काय करु शकतो शकते हे पाहण्यासाठी तिला स्वतःलाच आव्हान देत राहायचे आहे.
आपल्याला सर्व प्रकारचे चित्रपट करण्याची इच्छा असल्याचे आलियाने म्हटले होते. त्यासाठी तिला संधी मिळेल याचा तिला विश्वास वाटतो.