मुंबई- कोरोना विषाणूमुळे देशभरात उद्रेक झाला आहे. अशातच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसणार आहे. असा प्रंसगी सावध राहण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केले आहे.
मुंबईत सलग पाऊस कोसळत आहे. निसर्ग चक्रीवादळ १२० च्या वेगाने दाखल होणार आहे. अशात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो बीएमसीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करताना दिसतो.
अक्षय व्हिडिओमध्ये म्हणतो, ''बाहेर पाऊस पडत आहे. दरवर्षी या हंगामाची प्रतीक्षा असते. पण 2020 हे एक वेगळे, विचित्र वर्ष आहे. अधूनमधून त्रास होतोय. अगदी पावसाचासुद्धा आरामात आनंद घेता येत नाही. पावसाच्या सरीच्या मागोमाग चक्रीवादळ येत आहे. जर देव आपल्यावर प्रसन्न झाला असेल तर कदाचित हे चक्रीवादळ येथे येणार नाही किंवा चक्रीवादळाचा वेग इतका असू शकणार नाही.''
परंतु जरी चक्रीवादळ दाखल झाले तरी आम्ही घाबरणार्यांपैकी नाही. आम्ही आधीच सुरक्षेची तयारी सुरू केली आहे. बीएमसीने संपूर्ण यादी तयार केली आहे. या नियमांचे पालन करुयात आणि वादळासोबत लढा देऊयात. यासोबत अक्षयने म्हटलंय की, ''घरीच थांबा, समुद्र किनारी जाऊ नका.''